बनवा चमचमीत मसाला पाव अगदी काही मिनिटात….

मसाला पाव हे एक भारतीय स्ट्रीट फूड (Street Food) आहे. हे स्ट्रीट फूड तरुणाई मध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. कॉलेजच्या बाहेर अथवा टपरीवर सुद्धा आपल्याला मसाला पाव मिळतो. आपल्या सगळ्यांनाच चमचमीत पदार्थ खायला भरपूर आवडतात

बनवा चमचमीत मसाला पाव अगदी काही मिनिटात….

मसाला पाव हे एक भारतीय स्ट्रीट फूड (Street Food) आहे. हे स्ट्रीट फूड तरुणाई मध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. कॉलेजच्या बाहेर अथवा टपरीवर सुद्धा आपल्याला मसाला पाव मिळतो. आपल्या सगळ्यांनाच चमचमीत पदार्थ खायला भरपूर आवडतात. आपल्याला शहरात मसाला पाव विकणारे बरेच लोक दिसतील. त्यांच्याकडे तर तरुणाईच्या रंगाचं लागल्या असतात. तरुणाईंमध्ये लोकप्रिय असलेला मसाला पाव हा आपण घरी सुद्धा बनवू शकतो. रस्तावर उभं राहून अगदी स्पायसी (Spicy), बटरी (Buttery) असलेला त्यावर लिंबू पिळून त्याला चमचमीत बनवलेला मसाला पाव खाण्याची मजाच निराळी आहे. पण बाहेरचे पदार्थ आपल्या शरीरासाठी चांगले नसतात. काही वेळेस बाहेरचे पदार्थ खाऊन आपल्याला त्रास होण्याचा धोका असतो. शिवाय बाहेर पदार्थ बनविण्यासाठी अगदी कमी कोलिटीचे (Quality) चे बटर, मसाले वापरतात. ते आपल्या शरीरासाठी अतिशय घातक असतात. पण त्यावर एक दुसरा उपाय आहे. आपण हा मसाला पाव घरी सुद्धा बनवू शकतो. चला तर मग जाणून घेऊया हा चमचमीत मसाला पाव बनवतात तरी कसा!

मसाला पाव बनविण्यासाठी लागणारे साहित्य :

मसाला पाव बनविण्यासाठी लागणारी कृती:

सर्वप्रथम लादीपाव हे वडापावसाठी कापतो त्याचप्रमाणे मधून आडवा कापून घ्या. त्यानंतर अमूल बटर हे संपूर्ण पावला लावून घ्या. त्यानंतर गॅस पेटवून तुमच्याकडील असलेला एक तवा घ्या आणि त्याला गॅसवर गरम करत ठेवा. त्या तव्यामध्ये १ चमचा बटर घाला तसेच बारीक चिरलेली भोपळी मिरची घालून घेऊन चांगल्या प्रकारे त्याला परतवून घ्या. नंतर योग्य प्रमाणात मसाला घालावा आणि त्यात कापलेला पाव उघडून भाजून घ्या. अश्याप्रकारे सर्व पाव भाजून घ्यावे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा किंवा टोमॅटो घालू शकता. अशाप्रकारे तुमचा चमचमीत मसाला पाव खाण्यास तयार होईल.

हे ही वाचा : 

बॉलीवूडच्या खिलाडीने दिली केदारनाथ मंदिराला भेट

Accident च्या प्रमाणात वाढ! करा ‘या’ गोष्टींचे पालन | Follow ‘these’ things |

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version