Friday, June 2, 2023

Latest Posts

यंदाच्या आषाढी वारीचे कसे असेल नियोजन …

आषाढी वारी नियोजनाबाबत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान,आषाढी एकादशी २९ जून रोजी आहे.

आषाढी वारी नियोजनाबाबत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान,आषाढी एकादशी २९ जून रोजी आहे. आषाढी वारी नियोजनाबाबत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या आषाढी वारीमध्ये ‘हरित वारी स्वच्छ वारी’ या संकल्पनेवर आधारित वारीमध्ये पर्यावरण साक्षरतेचा जागर होणार आहे. गेल्या वर्षी दहा हजार वृक्ष लागवड पालखी मार्गावर प्रशासनाकडून करण्यात आली होती.तसेच वारी दरम्यान मूलभूत गोष्टींवर देखील प्रकाश टाकला गेला. यावर्षीच्या वारीत सीसीटीव्ही देखील बसवण्यात आले आहे.

यंदा अधिकची वृक्ष लागवड करून प्लास्टिक संकलन केंद्र उभा करून पर्यावरणाचा जागर करण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या महिला वारकरऱ्यांसाठी हिरकणी कक्ष, स्वतंत्र महिला आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेपांडे म्हणाले, आषाढी यात्रा कालावधी वारकरी, भाविक व नागरिकांच्या सुविधेला प्राधान्य दिले आहे.पालखी मार्गावरील बंदोबस्त तसेच वाहतूक याबाबत सुक्ष्म नियोजन करण्यात येणार असून यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. राज्य शासनाने आषाढी यात्रा कालावधीत जादा एस.टी. बसेस सोडण्याचे नियोजन केले असून यात्रेत महिला भाविक मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता लक्षात घेऊन महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच शहरात १६२ सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. आषढी सोहळा निर्विघ्नरित्या पार पाडण्यासाठी वारकरी, भाविकांनी तसेच नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, निवासी उपल्हिाधिकारी शमा पवार,उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मंदीर समिचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, कबीर महाराज, राणा महाराज वासकर, विश्वस्त, फडकरी, दिडींकरी, नागरिक, व्यापारी संघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर तसेच संबधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.या बैठकीत विश्वस्त, फडकरी, दिडींकरी, व्यापारी व नागरिकांनी सूचना मांडल्या या सूचना बाबत तात्काळ संबधित विभागाने कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

हे ही वाचा:

बॉलीवूडच्या खिलाडीने दिली केदारनाथ मंदिराला भेट

तासंतास रील्स पाहणे पडेल महागात, जडतील मानसिक आजार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss