Friday, April 26, 2024

Latest Posts

हॉटेल स्टाईलने Shahi Paneer बनवा ते ही घरच्या घरी

ढाबास्टाईल म्हणजेच हॉटेल स्टाईलने भाज्या खायला प्रत्येकालाच आवडतात. अश्या भाज्या खाऊन पोट तर भरतं पण मन मात्र भारत नाही. हॉटेलसारखी भाजी घरी तयार होत नाही अशी प्रत्येकाचीच तक्रार असते.

ढाबास्टाईल म्हणजेच हॉटेल स्टाईलने भाज्या खायला प्रत्येकालाच आवडतात. अश्या भाज्या खाऊन पोट तर भरतं पण मन मात्र भारत नाही. हॉटेलसारखी भाजी घरी तयार होत नाही अशी प्रत्येकाचीच तक्रार असते. चला तर मग जाणून घेऊयात काय केल्याने होईल हॉटेल सारखी शाही पनीर (Shahi Paneer) भाजी घरच्या घरी तयार करता येईल. हॉटेल सारखी शाही पनीर (Shahi Paneer) बनवण्यासाठी दैनिंदिन साहित्यातीलच काही गोष्टी आपल्याला लागतील.

कांदा, आले, लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरी, स्टँडिंग आणि ग्राउंड गरम मसाले, लाल तिखट, काश्मिरी लाल तिखट, कोथिंबीर, मीठ, कोरडी कैरी पावडर किंवा चाट मसाला इत्यादी साहित्य आपल्याला शाही पनीर (Shahi Paneer) बनवण्यासाठी लागेल. आपल्याला जे घटक वेगळे घालायचे आहेत ते म्हणजे दही आणि काजू. योग्य वेळी योग्य पद्धतीने दही आणि काजू मिसळून आपण घरगुती ग्रेव्हीला हॉटेल सारखा रॉयल टच देऊ शकतो. ग्रेव्ही तयार करण्यासाठी कांदा, आले आणि लसूण बारीक करून पेस्ट तयार करून घ्यावी. नंतर ती पेस्ट भाजून त्यात टोमॅटो प्युरी मिक्स करून घ्यावी. आपल्या आवडी नुसार या ग्रेव्ही बनवण्याच्या प्रक्रियेत बदल करावा.

हॉटेल सारखं शाही पनीर बनवण्यासाठी पुढील कृती करावी

१) एका कढईत तेल टाकून गरम करून घावे व त्यात गरम मसाला घालावा. गरम मसाल्यात तमालपत्र, मोठी वेलची, छोटी वेलची, लवंग, काळी मिरी, दालचिनी, जिरे या गोष्टींचा समावेश करावा.

२) कढईतील मसाला भाजून झाल्या नंतर त्यात कांदा, आले, लसूण घालावे. आपल्याला पेस्टच्या स्वरूपात सर्वकाही तेलात घालण्याची आवशक्यता नाही. काही तुकडे मोठे राहिले तरी चालतील. काहीवेळा नंतर भाजलेल्या मसाल्यात टोमॅटोचे तुकडे घालावे. सर्व मसाले हलके भाजून घ्यावे, नंतर काजू घालून भाजलेला मसाला झाकून ठेवावा.

३) काही वेळानंतर काजू मऊ झाल्यावर त्यात दही मिक्स करून काजू बारीक करून घावे. त्यानंतर गरम कढईत ते टाकून त्यात मसाला घालून भाजून घ्यावे. यानंतर यात सुका मसाला टाकल्यावर हॉटेलसारखी ग्रेव्ही तयार होईल. तसेच तयार झालेल्या ग्रेव्ही मध्ये फ्राय केलेले पनीर टाकल्याने आपले हॉटेल सारखे शाही पनीर तयार होईल.

हे ही वाचा : 

उद्या घराबाहेर पडणार आहात? तब्ब्ल १४ तासांचा आहे पॉवर ब्लॉक

Adipurush चित्रपटातील Jai Shri Ram गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस

Time maharashtra exclusive : निधी खेचून आणणे हे त्या प्रतिनिधींच्या स्किल्सवर अवलंबलेले, बघूया नेमकं काय म्हणाले Milind Patankar

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss