Saturday, July 27, 2024

Latest Posts

घरच्या घरी बनवा ‘रेड वेलवेट

ख्रिसमस सणाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत.

ख्रिसमस सणाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या दिवशी अनेक प्रकारचे केक बनवले जातात. अनेक घरांमध्ये या दिवसांत वेगवेगळे केक्स तयार करण्याची परंपरा आहे. यावर्षी जर तुम्ही ही काही बनवणार असाल तर रेड वेलवेट कपकेक्स नक्की करून पाहा. रेड वेल्वेट केक चवीला सुद्धा छान लागतो. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना केक खायला आवडतो. रेड वेलवेट कपकेक्सची मऊ आणि मलईयुक्त बेकसुद्धा बनवले जातात. म्हणूनच जेव्हा त्यांना रेड वेलवेट कपकेक्स खाण्याची इच्छा असते तेव्हा ते बाजारातून खरेदी करतात. हे वाचल्यानंतर आपल्या तोंडाला पाणी सुटत असेल तर ते बाजारातून आणण्याऐवजी घरीच बनवा तुम्हाला नक्की जमेल.

साहित्य:-

एक कप आटा
२०० ग्रॅम दूध
१०० ग्रॅम लोणी
एक टीस्पून बेकिंग पाउडर
एक टीस्पून फूड कलर
एक टीस्पून व्हॅनिला इसेन्स
एक टीस्पून व्हिनेगर
एक टीस्पून बेकिंग सोडा
दोन मोठे चमचे पिठी साखर
एक टीस्पून कोको पाउडर
एक कप ताक
आवश्यकतेनुसार पाणी

कृती:-

एका बाऊलमध्ये २०० ग्रॅम आटवलेले दूध घ्या. त्यानंतर त्यात १०० ग्रॅम लोणी मिक्स करा. नंतर दोन मोठे चमचे पिठी साखर आणि एक कप मैदा मिक्स करा. त्यानंतर एक चमचा कोको पावडर, एक चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, एक चमचा व्हॅनिला इसेन्स, एक चमचा व्हिनेगर घाला. हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. त्यानंतर त्यात एक कप बटर/ लोणी घाला आणि ३/४ चमचा रेड फूड कलर मिक्स करा. अशा प्रकारे आपले पिठ तयार होईल. आता या पिठाला कपकेकमध्ये भरून घ्या. कपकेकच्या साचामध्ये ३/४ पीठ भरावे. कारण बेक झाल्यानंतर बेक फुलतो. आता ओव्हनमध्ये कपकेक्स घाला. ओव्हनला १० मिनिटे गरम करावे आणि नंतर १५-२० मिनिटांसाठी १८० डिग्री सेल्सियस वर कपकेक्स बेक करावे. या पद्धतीने रेड वेलवेट केक तयार करा.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री प्रचारासाठी गेले मात्र दुसरे गेलेच नाही – जयंत पाटील

दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार महाराष्ट्राची लाडकी अप्सरा!,सोनालीने व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss