कडक उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा रोझ लस्सी

राज्यभरात सगळीकडे काही प्रमाणात उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे.

कडक उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा रोझ लस्सी

राज्यभरात सगळीकडे काही प्रमाणात उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. अनेक राज्यात जास्त प्रमाणात उन्हाचा पारा वाढला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे असते. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी थंड पदार्थ किंवा पेय पिणे गरजेचे असते. थंड पदार्थांचे सेवन केल्याने शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो. अश्यावेळी तुम्ही घरच्या घरी दही वापरून सोप्या पद्धतीमध्ये रोझ लस्सी बनवून पिऊ शकता. लस्सी पिल्याने शरीराला थंडावा मिळतो.शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. लस्सी बनवण्यासाठी देखील सोपी आहे. चला तर जाणून घेऊया रेसिपी..

साहित्य:-

३ वाटी दही
अर्धा कप गुलाब सिरप
२ चमचे साखर
गुलाबाच्या पाकळ्या सजवण्यासाठी

कृती:-

रोझ लस्सी बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक मोठे बाऊल घ्या. त्या बाऊलमध्ये ३ वाटी ताजे दही घ्या. त्यानंतर दही नीट मिक्स करून घ्या. दही पूर्ण गुळगुळीत झाल्यानंतर त्यात साखर टाकून मिक्स करून घ्या. साखर घालून झाल्यानंतर दही पुन्हा एकदा किमान १० ते १५ मिनिटे चांगले मिसळून घ्या.मिसळून झाल्यानंतर त्यात बर्फाचे तुकडे आणि थोडं थंड पाणी घाला. नंतर त्यात गुलाबाचे सिरप घाला. सिरप घालून झाल्यानंतर लस्सीचा रंग गुलाबी होईपर्यंत हे नीट मिक्स करून घ्या. तयार आहे रोझ लस्सी. लस्सी बनवून झाल्यानंतर लस्सी ग्लासामध्ये ओता आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकून सजवून घ्या.

हे ही वाचा:

‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’मधील मस्तीने भरलेले ‘साला कॅरेक्टर’ पहिले गाणे प्रदर्शित

तेजस्विनी पंडितने केली ‘येक नंबर’ या चित्रपटाची घोषणा,सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version