हा Korean पदार्थ बनवा घरच्या घरीच, जाणून घ्या संपूर्ण रेसिपी

आजकाल कोरियन (Korean) पदार्थ भारतात प्रचंड प्रसिद्ध झाले आहे. चायनीज पदार्थांप्रमाणेच आता कोरियन डिशेस (Dishes) देखील तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहे. मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे चमचमीत कोरियन पदार्थ खायला मिळतात.

हा Korean पदार्थ बनवा घरच्या घरीच, जाणून घ्या संपूर्ण रेसिपी

आजकाल कोरियन (Korean) पदार्थ भारतात प्रचंड प्रसिद्ध झाले आहे. चायनीज पदार्थांप्रमाणेच आता कोरियन डिशेस (Dishes) देखील तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहे. मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे चमचमीत कोरियन पदार्थ खायला मिळतात. सध्या कोरिया हा देश केपॉप (Kpop) साठी जगभरात प्रसिद्ध झाला आहे. केपॉप हा त्यांचा एक मनोरंजनाचा भाग आहे. ज्यामध्ये गाण्यासोबत डान्स केला जातो. हा केपॉप जगभरात प्रसिद्ध झाल्यामुळे या देशाबद्दल त्यांच्या खाद्य संस्कृतीबद्दल अनेकांना आकर्षण वाटू लागले आहे. अशातच कोरियन फूड (Korean food) हे मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये अगदी जास्त किमतीत मिळते. पण तुम्हाला माहित आहे का तुम्ही अगदी साध्या पद्धतीने हे चमचमीत पदार्थ घरच्या घरी बनवू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशीच एक कोरियन डिश सांगणार आहोत. त्या डिशचे नाव आहे कोरियन चिली गार्लिक पोटॅटो नूडल्स (Korean chilli garlic potato noodles ). चला तर मग जाणून घेऊया ही साधी सोपी रेसिपी.

चिली गार्लिक पोटॅटो नूडल्स बनविण्यासाठी लागणारे साहित्य –

उकडलेलं बटाटे ५
चवीनुसार मीठ
कॉर्नफ्लॉवर १ कप
रेड चिली सॉस २ चमचे
सोया सॉस २ चमचे
साखर २ चमचे
कांद्याची पात
तेल
लसूण

चिली गार्लिक पोटॅटो नूडल्स बनविण्यासाठीची कृती –

सर्वप्रथम उकडलेले बटाटे घेऊन त्याची साले काढून घ्यावी. साले काढून टाकल्यावर एका भांड्यात उकडलेले बटाटे कुस्करून घ्यावे. त्यानंतर दुसरीकडे एक बाउल घेऊन त्यात उकडलेले बटाटे, कॉर्नफ्लॉवर आणि त्यासोबतच मीठ टाकून घ्यावे व्यवस्थित मिक्स करून त्याचे घट्ट मिश्रण करून घ्यावे. चिकट झाल्यास तेलाचा वापर करावा. त्यानंतर त्याचे लहान लहान गोळे बनवून त्याला चपटे करून घ्यावे. त्या चपट्या गोळ्यांच्या मध्य भागावर बॉटलच्या मदतीने आकार द्यावा. त्यानंतर बनवलेले चपटे गोळे साधारण तीन मिनिटासाठी उकडून घ्यावे. त्यानंतर त्यांना गरम पाण्यामधून काढून थंड पाण्यामध्ये ठेवावे. त्यानंतर दुसरा बाउल घेऊन त्यामध्ये रेड चिली सॉस, सोया सॉस, साखर आणि कांद्याची पात टाकून ठेवावी. त्यानंतर दुसरीकडे पॅन घेऊन त्यामध्ये तेल टाकून गरम करत ठेवावे आणि त्यात लसूण टाकावी. नंतर लसणीची केलेली फोडणी त्या बाउलमध्ये टाकावी आणि त्यात बटाट्याचे चपटे गोळे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. अशाप्रकारे तुमचे चिली गार्लिक पोटॅटो नूडल्स तयार होतील.

हे ही वाचा:

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त अशा पद्धतीने सजवा पूजेचे ताट

“आदिपुरुष” चित्रपटातील गाणे झाले रिलीज, प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद

सप्तशृंगी देवी मंदिर संस्थानने ड्रेसकोड संदर्भात कोणताही निर्णय नाही

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version