Thursday, April 25, 2024

Latest Posts

राशिभविष्य, १० मे २०२३, आजच्या दिवशी आपल्या…

मानसिक ताणतणावर मात करण्यासाठी अध्यात्मिक, धार्मिक उपाययोजनांची सध्या तातडीची गरज आहे.

माझी रास

मेष – मानसिक ताणतणावर मात करण्यासाठी अध्यात्मिक, धार्मिक उपाययोजनांची सध्या तातडीची गरज आहे. ध्यानधारणा आणि योगसाधना तुम्हाला मानसिकदृष्ट्या कणखर बनवेल.

वृषभ – आजच्या दिवशी आपल्या आरोग्याची कसलीही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या सोभवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल.

मिथुन – तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील.अर्थिक लाभ संभवतो.

कर्क – नशिबावर हवाला ठेवून बसू नका, त्याऐवजी आपले आरोग्य सुधारण्याचा प्रयत्ना करा. दिवसाची सुरवात जरी थोडी थकणारी राहील परंतु, जसे जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील

सिंह – बोलण्यापूर्वी दोनवेळा विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे अनवधानाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल.

कन्या – अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे तर, आज कुणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभ ही होऊ शकतो.

तुळ – आजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल.

वृश्चिक – कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. आज तुम्हाला धन संबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे परंतु, तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीला ही नफ्यामध्ये बदलू शकतात.

धनु – तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. पारंपरिक पद्धतींच्या गुंतवणूकी मध्ये उत्तम लाभ होईल.

मकर – प्रकृतीची काळजी घ्या आणि सर्व गोष्टी व्यवस्थित करा. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या.

कुंभ – शाररीक व्याधीपासून मुक्तता होण्याची शक्यता आहे. अधिकचा पैसा स्थावर मालमत्तेच्या बाबतीत गुंतवा.

मीन – हवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्ची करा.

हे ही वाचा : 

कोकण स्पेशिअल चमचमीत फणसाची भाजी माहीत आहे कशी बनवतात? जाणून घ्या आमच्या स्पेशिअल रेसिपी मधून!

न्यू स्टाईलमध्ये बनवा White Sauce Pasta

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss