Friday, April 19, 2024

Latest Posts

चेहरा खरखरीत झाला असेल तर चेहऱ्यावर जायफळ लावण ठरेल फायदेशीर,जाणुन घ्या फायदे

आपल्या चेहऱ्यावर आपण विशेष प्रेम करत असतो.चेहऱ्यावर कोणताच प्रकारचा डाग उमटु नये यासाठी विविध पद्धती आपण वापरत असतो.

आपल्या चेहऱ्यावर आपण विशेष प्रेम करत असतो.चेहऱ्यावर कोणताच प्रकारचा डाग उमटु नये यासाठी विविध पद्धती आपण वापरत असतो.चेहरा मुलायम दिसण्यासाठी,चेहऱ्यावर टवटवीत पणा यावा यासाठी आपण वेगवेगळे महागडे प्रोडक्ट्स आपण वापरत असतो.पण त्याचा फायदा सगळ्यांनाच होतो असे नाही.मोठमोठ्या पार्लरमध्ये जाऊन विविध प्रकारचे फेस पॅक ही चेहऱ्याला लावत असतो.मात्र घरघुती उपाय करण्यासाठी आपण कायमच दुर्लक्ष करत असतो.तर चेहऱ्यावर आणण्यासाठी तुम्ही जायफळची मदत घेऊ शकता.जायफळमध्ये पोषकतत्वांचे विपुल प्रमाण आढळून येते. औषधी घटकांनी परिपूर्ण असलेले हे जायफळ आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. जायफळ त्वचेवर लावल्याने चेहऱ्यावर छान चमक येते.आणि चेहऱ्यावरील काळपटपणा देखील काढला जातो.आणि चेहऱ्यावर एक चांगला ग्लो येतो.मात्र, जायफळ चेहऱ्यावर लावण्याचे इतर अनेक फायदे आहेत. जाणून घेऊयात जायफळ चेहऱ्यावर लावण्याचे फायदे

मृत त्वचा काढून टाकते

चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी जायफळ चांगलेच उपयुक्त पडतात.बाहेर जास्त वावरल्यामुळे चेहऱ्यावर धुळ साचून चेहरा काळवणा होतो.दरम्यान यावेळी जायफळ हे नैसर्गिकदृष्या चेहऱ्यावर चांगला ग्लो देते.जायफळ उगाळून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर छान चमक येते. यासोबतच, त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास जायफळ मदत करते. जायफळ हे एक प्रकारचे नैसर्गिक एक्सफोलिएंट आहे. त्यामुळे, जायफळ त्वचेवर लावल्याने आपली त्वचा स्वच्छ राहते. जायफळ हे संवेदनशील त्वचेच्या लोकांसाठी देखील फायदेशीर आहे.

डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांची समस्या दूर करते

पुरेशी झोप न झाल्याने आपल्या डोळ्या खाली काळी वर्तुळ येतात,त्यावेळी आपला चेहरा अगदी आजारी व्यक्ती सारखा दिसू लागतो.त्यावेळी जायफळ हे उपयुक्त ठरु शकते.जायफळ उगाळल्यानंतर त्यात गुलाबजल मिसळा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर आणि डोळ्यांखाली लावा. हा उपाय केल्याने डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांची समस्या दूर होण्यास मदत होते. शिवाय, डोळ्यांभोवतीची त्वचा देखील स्वच्छ होते. जायफळ चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचे आतून चांगल्या प्रकारे मॉईश्चरायझेशन होते आणि चेहरा चमकदार दिसू लागतो.दरम्यान जायफळ हे नैसर्गिक सौंदर्य चेहऱ्यावर देत असतं.

हे ही वाचा:

भुजबळांनी राजीनामा देऊन उपकार केले नाही, मनोज जरांगेंची भुजबळांवर टीका

Uddhav Thackeray Live , रत्नागिरीतून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर साधला निशाणा, कुणीही न मागता फुटेज समोर कसं आलं?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss