Wednesday, April 24, 2024

Latest Posts

भुजबळांनी राजीनामा देऊन उपकार केले नाही, मनोज जरांगेंची भुजबळांवर टीका

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे लाखो मराठा बांधवाना घेऊन मुंबईच्या दिशेने आले होते.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे लाखो मराठा बांधवाना घेऊन मुंबईच्या दिशेने आले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढण्यात आला आहे. पण त्या अद्यादेशाची ९ फेब्रुवारी पर्यंत अंमलबजावणी झाली नाही तर १० फेब्रुवारीपासून पुन्हा आंदोलन सुरु करणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सरकारच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी वाद सुरु आहे. छगन भुजबळांच्या राजीनाम्यावरून मनोज जरांगे म्हणाले, राजीनामा दे नाहीतर डोक्यावर घेऊन फिर, अन्यथा समुद्रात जावे आम्हाला काही देणेघेणे नाही, भुजबळांनी राजीनामा देऊन उपकार केले नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.

यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, एवढा मोठा मंत्री असून झोपेतून उठल्या सारखा बोलत आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना बदनाम करण्याचा भुजबळ यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे. गोरगरीब लोकं मेले पाहिजे असे भुजबळ यांचे विचार असून, मग मराठा असो की ओबीसी असो, ज्यांचे त्यांचे विचार असतात. ओबीसी-मराठा एकत्र डीजे लावून नाचत आहेत. ज्या पक्षात जाणार त्यांना अडचणीत आणण्याची भुजबळ यांची सवय आहेत. भुजबळ कोणत्या पक्षात जावे आम्हाला काही देणघेणे नाही. राजीनामा दिला तर आम्हाला काय करायचं, राजीनामा द्यावा अन्यथा काही करो आम्हाला काहीच देणघेण नाही. राजीनामा दे नाहीतर डोक्यावर घेऊन फिर, राजीनामा देऊन उपकार केले नाही. शेरशायरी करणारे भुजबळ दुकान टाकून तीन-तीन रुपये जमा करणार का?, असा खेचक टोला मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना लगावला आहे.

मराठा समाजाच्या सापडलेल्या नोंदींमध्ये खाडाखोड असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, एवढा मोठा मंत्री असून झोपेतून उठून बोलल्या सारखं बोलत आहे. कुठेही खाडाखोड केलेली नाही. शेवटी शासन आहे, कायदा आहे. यासाठी नियम आहे, अभ्यासक आहे, समिती आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात सरकारने सोय सुविधा उपलब्ध करून दिले असताना, स्वतःच्या सरकारवर भुजबळ शंका घेत आहे. भुजबळ यांना अजित पवार आणि फडणवीसांना बदनाम करायचे आहे. हेच त्यांचे स्वप्न आहे. सरकारवर आरोप करून या दोन लोकांना बदनाम करण्याचे त्यांचे प्रयत्न असून, त्यांची ही सवय आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

हे ही वाचा:

रणबीर कपुर ‘रामायण’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी सज्ज,’या’ देशात होणार लंका दहन शूट

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील घरी बॉम्ब असल्याचा फोन, धमकीचा फोन आल्याने सगळीकडे खळबळ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss