Tuesday, April 16, 2024

Latest Posts

Uddhav Thackeray Live , रत्नागिरीतून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर साधला निशाणा, कुणीही न मागता फुटेज समोर कसं आलं?

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख (Shiv Sena UBT) उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) हे पुढील महिन्यात कोकण दौऱ्यावर असणार आहेत. उद्धव ठाकरे हे चार आणि पाच फेब्रुवारी रोजी कोकण दौऱ्यावर असणार आहेत.

Shiv Sena Uddhav Thackeray  : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख (Shiv Sena UBT) उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) हे पुढील महिन्यात कोकण दौऱ्यावर असणार आहेत. उद्धव ठाकरे हे चार आणि पाच फेब्रुवारी रोजी कोकण दौऱ्यावर असणार आहेत. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. तर आज सावंतवाडी येथून उद्धव ठाकरे यांनी जनेतला संबोधित केले आहे.

तसेच उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, अनपेक्षित पणे मी मुख्यमंत्री झालो होतो. या संपूर्ण दोन अडीच वर्षाच्या कालखंडात मी काय केले ते लोकांसमोर आहे. आणि कोणालाही नाही असं प्रेम म्हणजेच कुटुंबातील सद्य म्हणून प्रेम देता हे माझा भाग्य आहे असं आज उद्धव ठाकरे म्हणले आहेत. मी तुमच्यासाठी आलो आहे तुम्ही माझं कुटुंब आहे असं म्हणत ठाकरेंनी कार्यकर्त्यांना साद घातली आहे. हा जनसंवाद नाही आहे हा कुटुंबासोबतच संवाद आहे. आपली मन की बात नाही तर दिल की बात आहे. हृदयात काम आणि हाताला काम असं चालू आहे.

यावेळी जनतेला संबोधित करता असताना उद्धव ठाकरे यांनी सर्वात आधी ठाणे येथील झालेल्या घटनेवरून सरकारवर हल्लबोल केला आहे. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर बंदुकीने गोळीबार केला. आणि वादाला सुरवात ही झाली आहे. यावेळी युद्ध ठाकरे म्हणले आहेत की, गणपत गायकवाड यांनी गुन्हा केला तर त्याच पटकन फुटेज हे बाहेर आलं कोणी मागितलं होत ? कुणीही न मागता फुटेज समोर कसं आलं? असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. की कोकणातून गुंडगिरी साफ करून टाकायची आहे. गॅंगवॉर करणारे पुन्हा सत्तेत नको आहेत असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकण दौऱ्यातील सभेत केले आहे.

मी अगोदर एक मेडिकल कॉलेजला परवानगी दिली. त्याअगोदर देखील एका मेडिकल कॉलेजला परवानगी दिली मी खरी परवानगी दिली, पण मला कुठं माहिती तिकडे कोंबड्यांचा कारखाना ठेवलाय, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जनसंपर्क दौऱ्यावर असून त्यांची राणेंच्या बालेकिल्ल्यातही तोफ धडाडणार आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, जून निवडणूक बाकी आहे पण मी तुम्हाला भेटायला आलो आहे. निवडणुकीला देखील येईन आणि विजयी गुलाल उधळायला पण मी इथेच येईन. उद्धव ठाकरे यांच्याकडून यावेळी सत्यविजय भिसे आणि श्रीधर नाईक खून प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला. तुमची पिलावळ आहे ती व्यवस्थित काम करत असतील, तर तुम्हाला दुसऱ्यांची गरज पडली नसती, असा टोलाही त्यांनी पीएम मोदी यांना लगावला.

हे ही वाचा:

गडचिरोली जिल्हा हा नेक्स्ट स्टील ऑफ इंडिया होणार, देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

Aaditya Thackeray PC Live : निवडणूक तोंडावर आल्यावर लोकार्पणाचे कार्यक्रम…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss