रोजच्या आहारातील ‘या’ भाजीचे आहेत आश्चर्यकारक फायदे! वाचून तुम्हीही व्हाल थक्क…

आपल्या रोजच्या आहारात टोमॅटोचा समावेश हमखास असतो. टोमॅटोमध्ये अनेक प्रकारचे नैसर्गिक सत्व आणि गुणधर्म असतात. टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचा घटक असतो जो त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यास मदत करतो.

रोजच्या आहारातील ‘या’ भाजीचे आहेत आश्चर्यकारक फायदे! वाचून तुम्हीही व्हाल थक्क…

आपल्या रोजच्या आहारात टोमॅटोचा समावेश हमखास असतो. टोमॅटोमध्ये अनेक प्रकारचे नैसर्गिक सत्व आणि गुणधर्म असतात. टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचा घटक असतो जो त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यास मदत करतो. तसेच टोमॅटोमुळे चेहऱ्यावरील टॅन व डेड त्वचा निघून जाण्यास मदत होते यामुळे आपला चेहरा नैसर्गिकरित्या उजळतो. चला तर मग जाणून घेऊयात कश्याप्रकारे टोमॅटो त्वचेवर लावल्याने टँकजसाठी फायदेशीर ठरेल.

टोमॅटोपासून सूप, सार, भाजी असे विविध पदार्थ बनवता येतात. टोमॅटो एक रसाळ भाजी आहे. अनेक लोक टोमॅटोचे रस किंवा कोशिंबीर देखील बनवतात. तसेच भाज्यांमध्ये टाकल्या जाणाऱ्या मसाल्यात ही टोमॅटोचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि व्हिटॅमिन ई (Vitamin E) सारखे गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळतात. याशिवाय टोमॅटो आपल्या त्वचेसाठी देखील मोठ्याप्रमाणात फादेशीर ठरतो. टोमॅटोमुळे आपला रंग सुधारतो व आपल्याला उजळलेली चमकदार त्वचा मिळते, चला तर पाहूया त्वचेवर टोमॅटो नेमके कसे लावावे…

टॅनिंग काढून टाकण्यासाठी टोमॅटो चा वापर –

चेह्ऱ्यावरील टॅनिंग काढण्यासाठी एका बाऊलमध्ये टोमॅटोचा रस काढून घ्यावा. नंतर त्यात २ चिमूट हळद आणि अर्धा चमचा चंदन पावडर घालून एकजीव करून घावे. या नंतर तयार झालेली पेस्ट म्हणजेच टोमॅटो फेसपॅक आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर लावावे. चेहऱ्यावर लावलेले फेसपॅक काहीवेळ चेहऱ्यावर सुकून देऊन थोड्यावेळानंतर स्वच्छ धुवून घावे.

त्वचेची डेड स्किन काढून टाकण्यासाठी टोमॅटो चा वापर –

टोमॅटो स्क्रब बनवण्यासाठी एका भांड्यात टोमॅटोचा रस आणि थोडी साखर मिसळून घावी. भांड्यातील मिश्रणाने म्हणजेच घरगुती टोमॅटो स्क्रब ने २ ते ३ मिनिटे चेहऱ्यावर मसाज करावी. हे नियमित केल्याने आपली त्वचा एक्सफोलिएट होईल व मृत त्वचा सहजपणे निघून जाईल.

चेहऱ्यावरील घाण साफ करण्यासाठी टोमॅटोचा वापर –

चेहऱ्यावरील घाण साफ करण्यासाठी अर्धे टोमॅटो कापून घेऊन हलक्या हातांनी चेहऱ्यावर चोळावे.याशिवाय टोमॅटोचा रस काढून चेहऱ्यावर मालिश करावी. यामुळे त्वचा अगदी स्वच्छ होते व चेहऱ्या वरील तेल निघून जाते. टोमॅटो चा उपयोग चेहऱ्यावर नैसर्गिक तेज आणण्यासाठी देखील होतो.

हे ही वाचा : 

राहुल गांधी यांनी केली ट्रकमधून सवारी: अंबाला ते चंदिगढ

महाविकास आघाडी एकजूटीने राहणार, मी तुम्हाला स्टँपपेपरवर लिहून देतो, अजित पवार

आज संध्याकाळी अरविंद केजरीवाल होणार मुंबईत दाखल, या नेत्यांची घेणार भेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version