Friday, April 26, 2024

Latest Posts

राहुल गांधी यांनी केली ट्रकमधून सवारी: अंबाला ते चंदिगढ

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान सगळ्यांची मन तर जिकलीच आणि त्याचा प्रत्यय कर्नाटक निवडणुकीमध्ये देखील दिसून आला.

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान सगळ्यांची मन तर जिकलीच आणि त्याचा प्रत्यय कर्नाटक निवडणुकीमध्ये देखील दिसून आला. राहुल गांधी सतत देशातल्या सामान्य लोकांशी जोडले जाण्याचा प्रयत्न करत असतात. याआधी त्यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बंगळूरमध्ये एका डिलिव्हरी बॉयसोबत स्कूटरवरुन देखील प्रवास केला होता. त्यांचा हा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला होता. बंगळूरमध्ये (Bengaluru) डिलिव्हरी बॉयसोबत प्रवास केल्यानंतर आता काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नुकतेच हरियाणामधील अंबालामध्ये ट्रक चालकासोबत प्रवास करतानाचं चित्र पाहायला मिळालं. तसेच ट्रक चालकासोबतचा राहुल गांधी यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. काँग्रेसचे नेते इम्रान प्रतापगढी यांनी देखील हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘ट्रक चालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी फक्त राहुल गांधी हे करु शकतात.

राहुल गांधी यांनी दिल्लीतून त्यांच्या ट्रकमधील प्रवासाला सुरुवात केली आणि ते शिमल्यासाठी निघाले होते. त्यांनी अंबाला येथून चंदीगडपर्यंत त्यांनी ट्रकमधून प्रवास केला. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत राहुल गांधी यांचे कौतुक केले. तसेच हा व्हिडीओ सोमवारी रात्रीचा असल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेस पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी आपल्या या प्रवासादरम्यान चालकांचे मुद्दे आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जन सामान्यांचे दुःख काय असतात. त्याचा खोलवर अभ्यास करून त्यांना येणाऱ्या अडचणी कोणत्या कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते हे जाणून घेण्यासाठी ते जनसामान्यांसोबत राहणे जास्त पसंत करतात. 

काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील राहुल गांधींचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी बसमधील सामान्य नागरिकांशी आणि मध्यरात्री ट्रक चालकांना भेटण्याचे कारण सांगितले आहे. त्यांनी म्हटले की, ‘राहुल गांधी यांना देशातील नागरिकांचे म्हणणे एकून घ्यायचे आहे, नागरिकांच्या अडचणी आणि समस्या त्यांना समजून घ्यायच्या आहेत. त्यांना असा करताना पाहून एक विश्वास निर्माण होतो,की कोणी तरी आहे जो लोकांसोबत उभा आहे. कोणी तरी आहे जो नागरिकांच्या चांगल्या भविष्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्याग करण्यास तयार आहे. कोणातरी आहे जो द्वेषाच्या बाजारात प्रेमाची दुकानं उघडत आहे.’ असं म्हणत सुप्रिया श्रीनेत यांनी राहुल गांधी याचं कौतुक केलं आहे.

हे ही वाचा:

२६ मे रोजी छ. संभाजीनगर जिल्ह्यात एकनाथ शिंदे घेणार जाहीर सभा

अभिनेते Ray Stevenson यांनी वयाच्या ५८ वर्षी घेतला अखेरचा श्वास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss