Saturday, June 3, 2023

Latest Posts

आज संध्याकाळी अरविंद केजरीवाल होणार मुंबईत दाखल, या नेत्यांची घेणार भेट

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे आजपासून दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. अरविंद केजरीवाल हे आज संध्याकाळी ७.०० वाजता मुंबईमध्ये दाखल होणार आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे आजपासून दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. अरविंद केजरीवाल हे आज संध्याकाळी ७.०० वाजता मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची ते भेट घेणार आहेत त्यानंतर अरविंद केजरीवाल मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान (Bhagwant Singh Maan), खासदार संजय सिंह (Sanjay Singh) आणि खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) हे देखील मुंबईमध्ये दाखल होणार आहेत.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजपासून दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर ते असणार आहेत. मुंबईमध्ये ते २४ मे रोजी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहेत. त्यांनतर ते २५ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची देखील ते भेट घेणार आहेत. याआधी अरविंद केजरीवाल यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांची देखील भेट घेतली होती. दिल्लीमध्ये अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगमध्ये राज्य सरकारलाही वाव देणारा आदेश सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने ११ मे रोजी दिला होता. परंतु केंद्र सरकारने फक्त आठ तासामध्ये अध्यादेश आणत हा निकालच रद्द केला होता.

दिल्ली हे पुर्ण राज्य नाही त्यामुळे इथे केंद्रच सुप्रीम असले पाहिजे असे म्हणत अध्यादेशात सगळे अधिकार पुन्हा उपराज्यपालांकडे देण्यात आले आहेत. अध्यादेशाचं पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा अध्यादेश राज्यसभेमध्ये रोखण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी मोहीम राबवली आहे. त्याबाबतीत अरविंद केजरीवाल विरोधी पक्षामधील नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत.

हे ही वाचा:

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

जयंत पाटलांना #ED चौकशीत घेऊन कोणाचा कार्यक्रम कोण करतंय? Who is targeting |

ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न – संजय शिरसाट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss