Wednesday, April 24, 2024

Latest Posts

जीभ भाजली? त्रास होतोय? त्वरित करा हा उपाय!

शांतपणे जेवण करणे हे खूप जास्त आवश्यक असते. काही लोक घाई घाईने जेवण करतात त्यामुळे घाईघाईने जेवल्याने खाल्लेले अन्न लवकर पचत नाही.

शांतपणे जेवण करणे हे खूप जास्त आवश्यक असते. काही लोक घाई घाईने जेवण करतात त्यामुळे घाईघाईने जेवल्याने खाल्लेले अन्न लवकर पचत नाही.आपल्या आवडीचे पदार्थ समोर आले कि ते आपण कधी खातो असे आपल्याला होते. अनेकदा असे आवडीचे पदार्थ समोर आले की ते गरम आहे याचा विचार न करता आपण ते लगेच खातो त्यामुळे गरम पदार्थ खाल्याने आपले तोंड किंवा जीभ भाजते. काहीवेळाने याचा प्रचंड त्रास आपल्याला होतो. बहुंताश लोकांना गरम पदार्थच खाण्याची सवय असते मात्र त्यांना देखील तोंड किंवा जीभ भाजण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. जीभ भाजल्यामुळे जेवताना खूप वेदना होतात. अश्या वेळेस आपल्याला अन्न देखील कमी जाते व आपले पोट भरत नाही. यामुळेच या समस्येवर त्वरित मात देण्यासाठी अनेक घरगुती उपाय तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

जीभ किंवा तोंड भाजल्यावर पुढील घरगुती उपाय करावे –

मध खाणे –

मधमध्ये अनेक औषधी गुण असतात. मध खाल्ल्याने असंख्य फायदे आपल्या शरीरावर होतात. जीभ भाजल्यावर मध खाणे फायदेशीर ठरत. त्यामुळे दुखणं कमी होत. चमचाभर मध जिभेवर ठेवल्याने त्रास कमी होतो. जीभ भाजल्यावर ही प्रक्रिया दिवसातून ५ ते ६ वेळेस केली पाहजे.

दहीचे सेवन करा –

दही मोठ्या प्रमाणात थंड असते. जीभ भाजल्यावर दहीचे सेवन करणे उपयुक्त ठरू शकते. जिभेचा जो भाग भाजला आहे, त्यावर दही ठेवल्याने त्रास कमी होऊ होतो. दह्याचे अनेक इतर फायदेही आहेत.

च्युइंगम खाणे –

आपण च्युइंगम खाल्य्याने तोंडामध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात लाळेची निर्मिती होते. लाळ जमा झाल्याने जिभेवरील जो भाग भाजला आहे, त्यावर ओलसरपणा टिकून राहतो. यामुळे जिभेची होणारी जळजळ कमी होते.

आईस्क्रीम खाणे –

गरम पदार्थ खाल्ल्याने जीभ भाजली असेल, तर आईस्क्रीम खाल्ल्याने जिभेवरील सूज आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. आईस्क्रीम खाताना जिभेचा जो भाग पोळला आहे, तो थंड राहतो.

पुदिना –

पुदिन्या मध्ये मेंथॉल मोठ्या प्रमाणात असते. पुदिना खाल्याने जळलेला भाग सुन्न होतो व जळजळ कमी होते. तसेच पुदिन्यात असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म भाजलेल्या त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवतात.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा : 

LIVE, उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

‘Anupamaa’ फेम Nitesh Pandey यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, एकाच इंडस्ट्रीला तिसरा धक्का

MI vs LSG, कोणता संघ होणार ट्रॉफीच्या शर्यतीतून बाहेर?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss