Friday, April 26, 2024

Latest Posts

MI vs LSG, कोणता संघ होणार ट्रॉफीच्या शर्यतीतून बाहेर?

कालपासून इंडियन प्रीमियर लीगची प्लेऑफ लढत सुरु झाली आहे. कोणता संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाणार आणि कोणता फायनल खेळणार याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

कालपासून इंडियन प्रीमियर लीगची (Indian premier League) प्लेऑफ (Playoff) लढत सुरु झाली आहे. कोणता संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाणार आणि कोणता फायनल खेळणार याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे. काल आयपीएल २०२३ चा क्वालिफायर १ (Qualifier 1) चा सामना पार पडला. चेन्नई सुपर किंग्स (Chennai super kings) अंतिम फेरीमध्ये उडी मारली आहे. आज एलिमिनेटर (Eliminator) सामना खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Gaints) या दोन संघांमध्ये रंगणार आहे. आज जो संघ सामन्यामध्ये विजय मिळवेल तो संघ क्वालिफायर २ चा सामना खेळणार आहे आणि ज्या संघाचा पराभव होईल तो संघ फायनलच्या शर्यतीतून बाहेर होईल.

आजच्या सामन्यामध्ये पाच वेळा विजेतेपद जिंकणार सांग मुंबई इंडियन्स आणि दुसऱ्यांदा प्ले ऑफ मध्ये पोहोचलेल्या लखनौ सुपर जायंट्स या दोन संघात लढत पाहायला मिळणार आहे. मागील सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय मिळवून प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. आजचा सामना चेन्नईमधील एम चिदंबरम स्टेडियमवर म्हणजेच चेपॉक स्टेडिअमवर (Chepauk Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे. आजचा सामना एलिमिनेटर सामना असल्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा असणार आहे.

आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ तीन वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये लखनौ सुपर जायंट्सने तीनही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला पराभवाची धूळ चारली आहे. यंदाच्या आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सची सुरु फार काही खास नव्हती परंतु त्यानंतर त्यांनी पुन्हा कमबॅक केले आणि प्लेऑफमध्ये जागा मिळवली. मागील सामन्यामध्ये कॅमेरॉन ग्रीनने शानदार शतक ठोकले तर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सुद्धा आपली बॅट चालवली. आजच्या सामन्यामध्ये कोणता संघ विजय मिळवेल आणि कोणता संघ शर्यतीतून बाहेर होईल याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

जयंत पाटलांना #ED चौकशीत घेऊन कोणाचा कार्यक्रम कोण करतंय? Who is targeting |

ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न – संजय शिरसाट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss