Tuesday, April 16, 2024

Latest Posts

चॉकलेट खाणं शरीरासाठी आहे फायदेशीर?डार्क चॉकलेट,की मिल्क चॉकलेट कोणतं ठरेल फायदेशीर जाणुन घ्या

चॉकलेट खाण्याची आवड ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाचं अलते.चॉकलेट्सचे विविध प्रकार बाजारात आता सहज मिळतात.

चॉकलेट खाण्याची आवड ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाचं अलते.चॉकलेट्सचे विविध प्रकार बाजारात आता सहज मिळतात. एवढेच नाही तर प्रत्येकाला त्याच्या चवीनुसार विशिष्ट प्रकारचे चॉकलेट आवडते. मुख्यतः डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट.काहींना डार्क चॉकलेट खायला आवडतं तर काहींना मिल्क चॉकलेट खायला आवडते.दोन्ही चॉकलेट्स मध्ये फरक असल्याने त्यांचे फायदे देखील अनेक आहेत. अशा परिस्थितीत, आरोग्याच्या दृष्टीने कोणते चॉकलेट तुमच्यासाठी चांगले आहे, हे जाणून घेऊया.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेट खायला हे प्रत्येकालाचं आवडते असं नाही,पण काहींना डार्क चॉकलेट खाणं खुप आवडतं.डार्क चॉकलेटमध्ये कोकोचे प्रमाण सुमारे 80 टक्के असते, जे मिल्‍क चॉकलेटपेक्षा जास्त असते. तुम्हाला त्याची चव थोडी कडवट वाटू शकते. त्यात झिंकचे प्रमाण 89, लोह 67, मॅग्नेशियम 58 टक्के आणि फायबरचे प्रमाण 11 ग्रॅम आहे. याव्यतिरिक्त, त्यात फॉस्फरस, पोटॅशियम आणि सेलेनियम मोठ्या प्रमाणात असते.

मिल्क चॉकलेट

मिल्क चॉकलेटमध्ये दूध आणि साखर जास्त असते. 100 ग्रॅम बारमध्ये तुम्हाला 535 कॅलरीज मिळतात, तर डार्क चॉकलेटमध्ये ही संख्या सुमारे 600 असते. तुम्हाला मिल्क चॉकलेटमध्ये डार्क चॉकलेटच्या तुलनेत कमी पोषक तत्व मिळतात. याशिवाय त्यात साखरेचे प्रमाणही जास्त असते. अशा स्थितीत याचे जास्त प्रमाणात सेवन करणे तुमच्यासाठी चांगले नाही.

कोणते चॉकलेट आरोग्यासाठी चांगले आहे?

आरोग्यासाठी डार्क चॉकलेट उत्तम आहे. चयापचय वाढवणे असो वा हृदयाचे आरोग्य किंवा रक्तदाब नियंत्रणात ठेवणे असो, डार्क चॉकलेट तुम्हाला प्रत्येक स्तरावर अनेक फायदे देते. तुम्ही दोन्ही चॉकलेट मर्यादित प्रमाणातच सेवन करावे.चॉकलेटमुळे ज्याचं वजन वाढत नसेल आणि ज्याला वजन वाढवण्याची इच्छा आहे ते चॉकलेट खाऊ शकतात.

हे ही वाचा: 

मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावर कुणाचाही विरोध होण्याचे कारण नाही; विजय वडेट्टीवारांनी दिली प्रतिक्रिया

छोट्या पडद्यावर नव्या मालिकांची पर्वणी,’ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss