Friday, April 19, 2024

Latest Posts

मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावर कुणाचाही विरोध होण्याचे कारण नाही; विजय वडेट्टीवारांनी दिली प्रतिक्रिया

आज राज्य विधिमंडळाची बैठक बोलावण्यात आली होती.

आज राज्य विधिमंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर राज्य विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणाचे विधेयक मांडण्यात आला. त्याला बहुमताने मंजुरी देण्यात आली आहे. त्यावेळी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आपली प्रतिक्रिया दिली आहे. बहुमत नाही तर एकमत म्हणावे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठा विधेयक राज्य मंत्रिमंडळात एकमताने मंजूर केल्याची घोषणा केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आज एक दिवसीय बैठक बोलावण्यात आली होती. इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का ना लावता मराठा समाजाला कायद्याचा चौकटीत बसणारे आरक्षण देण्याचे आश्वसन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली आहे. एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या बैठक मराठा आरक्षणाबाबत आपले मनोगत व्यक्त केले. मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावर कुणाचाही विरोध होण्याचे कारण नाही. आरक्षण मिळायला हवे ही आमची सगळ्यांची भूमिका होती. त्यामुळे याला बहुमत म्हणू नये, एकमत म्हणावे, आणि त्यानंतर मराठा आरक्षणाच्या विधेयकाचा मसुदा एकमताने मंजूर करण्यात आला, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आंतरवली सराटीमध्ये उपोषणासाठी बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा ११ वा दिवस आहे. उपोषणाला बसल्यानंतर मनोज जरांगे यांच्या शरीरात एकही अन्नाचा कण नसल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. मात्र आज बोलावण्यात आलेल्या अधिवेशनात सगेसोयरेबाबत कोणताही निर्णय न झाल्याने त्यांनी पुन्हा एकदा उपचार घेणं बंद केले आहे. त्यांनी सलाईन काढून फेकून दिली आहे.

हे ही वाचा:

छोट्या पडद्यावर नव्या मालिकांची पर्वणी,’ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Exclusive :CM Eknath Shinde यांना स्ट्रॅाबेरीचं काय आवडतं चव की रंग? म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss