सध्या ख्रिसमस (Christmas) चे वातावरण सगळीकडे पाहायला मिळत आहे. ख्रिसमस ट्री, चॉकलेट्स, गिफ्ट वेगवेगळे केक आणि अनेक पदार्थांनी किंवा डेकोरेशनच्या वस्तूंनी बाजार सजलेला पाहायला मिळत आहे. सांताक्लॉजच्या निमित्ताने किंवा ख्रिसमसच्या निमित्ताने बच्चे कंपनीचा एक मोठा उत्साह सगळीकडे पाहायला मिळत असतो आणि लहान मुलांना सुद्धा हा सण खूप आवडीने साजरा करायला आवडतो. मग ख्रिसमसच्या निमित्ताने लहान मुलांना खुश कसं करायचं, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.
सांता नोटबुक (Santa Notebook):
तुम्ही लहान मुलांना गिफ्ट देण्यासाठी सांताची नोटबुक सुद्धा देऊ शकता मुलांमध्ये अभ्यासाची गोडी लागावी या दृष्टीने आणि लेखनासाठी तुम्ही सांताक्लॉजची नोटबुक दिली तर ती मुलांना खूप आवडू शकेल.
सांताक्लॉज बेडशीट (Santa Claus Bedsheet):
ख्रिसमसच्या निमित्ताने तुम्ही लहान मुलांना सांताक्लॉज वाली बेडशीट भेट म्हणून देऊ शकता. जेणेकरून रात्री झोपताना त्यांचे सांताक्लॉज सोबत आम्ही आहोत असं त्यांना वाटून त्यांना कुठेतरी सांताक्लॉजचा आनंद घेता येऊ शकेल.
सांता गेम (Santa Game):
गेम्स म्हणजे लहान मुलांच्या आवडीचा विषय असतो आणि त्यासोबतच एक वेगळा विचार केला तर मेंदूला चालना देण्यासाठी सुद्धा गेम्स महत्त्वाचा भाग असतात. त्यामुळे गेम्स मधून काहीतरी शिकण्यासाठी तुम्ही सांता टेडी वाली गेम लहान मुलांना भेट देऊ शकता.
म्युझिकल इन्स्ट्रुमेंट (Musical Instrument):
जर तुमच्या मुलांना एखादा इन्स्ट्रुमेंट वाजवण्याची आवड असेल तर, त्याच्यासाठी तुम्ही सांताचा ड्रेस आणि एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट यांना भेट म्हणून देऊ शकता.
चॉकलेट आणि केक (Chocolate & Cake):
चॉकलेट आणि केक हा तर लहान मुलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे ख्रिसमसच्या निमित्ताने नवनवीन प्रकारचे चॉकलेट आणि केक बाजारात उपलब्ध असतात आणि त्यातही जर केक घरी बनवलेला असेल तर लहान मुलांना आनंद होतो त्यामुळे जर तुम्हाला लहान मुलांना काही भेट द्यायची असेल तर चॉकलेट आणि केकचा पर्याय उत्तम ठरू शकतो.
अशाप्रकारे या सोप्या पर्यायांचा अवलंब करा आणि तुमचा आणि लहान मुलांचा ख्रिसमस खास बनवा.
हे ही वाचा:
Christmas Wish 2023, ख्रिसमस निम्मित तुमच्या प्रियजनांना व्हाट्सअँपद्वारे द्या खास शुभेच्छा
भारतातील ‘या’ ठिकाणी ख्रिसमस सण मोठ्या धामधुमीत होतो साजरा