Wednesday, February 28, 2024

Latest Posts

Christmas 2023, ‘Secret Santa’ बनायचे? तर हे Best gift options घ्या जाणून

नाताळचा (Christmas 2023) हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सगळीकडे नाताळचा माहोल हा चांगलाच दिसून येत आहे. खरतर हा सण लहान मुलांसह अगदी मोठ्या लोकांचा देखील आवडता सण आहे. कारण ख्रिसमसला या छान छान गिफ्ट मिळतात, पार्टीचे आयोजन हे केले जाते.

Christmas Wish 2023 : नाताळचा (Christmas 2023) हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सगळीकडे नाताळचा माहोल हा चांगलाच दिसून येत आहे. खरतर हा सण लहान मुलांसह अगदी मोठ्या लोकांचा देखील आवडता सण आहे. कारण ख्रिसमसला या छान छान गिफ्ट मिळतात, पार्टीचे आयोजन हे केले जाते. आनंदाचा हा सण ख्रिसमस, दरवर्षी २५ डिसेंबरला जगभरात साजरा केला जातो. तसेच अनेक ठिकाणी ऑफिस मध्ये, मित्र मैत्रिणीच्या गृप मध्ये, किंवा आपल्या सोसायटीमध्ये ख्रिसमस निम्मित अनेक खेळांचे आयोजन हे केले जाते. तर यातील सर्वात महत्वाचं खेळ म्हणजे सिक्रेट सांता (Secret Santa). सध्या सगळीकडेच सिक्रेट सांताची आवजरून साजरा केला जातो. या निम्मित आपण आपल्या प्रियजनांना छान गिफ्ट देतो. परंतु यावेळी अनेक असा प्रश्न पडतो की आता काय गिफ्ट द्यावे? तर याच निम्मित आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ख्रिश्चन धर्माशी संबंधित हा सण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतातही ख्रिसमसचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिसमसच्या निमित्ताने लोक चर्चमध्ये जातात. विविध शहरांमध्ये अनेक प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. लोक आपल्या घरी चविष्ट पदार्थ बनवतात. घरी मित्र-मंडळी, पाहुण्यांना आमंत्रित करतात. तसेच नाताळनिम्मित शुभेच्छाचा वर्षाव देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात केला जातो.

वुलन हॅट – आता सर्वत्र हिवाळा सुरू आहे. तुम्ही तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला थंडीपासून वाचवण्यासाठी आणि त्याच्यास्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी छान आणि अशी लोकरीपासून विणलेली टोपी भेट देऊ शकता.

लंच बॅग – तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना किंवा मित्रांना एक छानशी लंच बॅग देखील गिफ्ट म्हणून देऊ शकता. ही बॅग फारच उपयुक्त देखील ठरेल. तुमचा टिफिन बॉक्स हा त्या लंच बॅग मध्ये अगदी उत्तम रित्या बसू शकतो.

पर्स – तुम्हाला ज्या व्यक्तीला गिफ्ट द्यायचं असेल आणि ती व्यक्ती महिला असेल तर तुम्ही छान अंडी सुंदर अशी पर्स गिफ्ट देऊ शकता. जेणेकरून टी पर्स ती महिला अगदी सहजरित्या वापरू देखील शकते.

कॉस्मॅटिक वस्तू – तुम्हाला ज्या व्यक्तीला गिफ्ट द्यायचं असेल आणि ती व्यक्ती महिला असेल तर तुम्ही सुंदर सुंदर कॉस्मॅटिकच्या वस्तू गिफ्ट म्हणून देऊ शकता. यामध्ये तुम्ही लिपस्टिक, नेलपेंट, कानातले, गळ्यातील नेकलेस अश्या अनेक वस्तू देऊ शकता.

पुस्तके – ज्यांना वाचनाची आवड आहे आणि पुस्तकांची आवड आहे त्यांच्यासाठी यापेक्षा चांगली भेट नाही. तुम्ही तुमच्या खास मित्राच्या आवडीच्या विषयावरची पुस्तके खरेदी करून त्याच्या पत्त्यावर पाठवू शकता. सिक्रेट सांताची ही भेट त्याला खूप आनंद देईल.

झाडे – झाडे सकारात्मकता देतात आणि घरात आनंददायी वातावरण निर्माण करतात. ख्रिसमसच्या निमित्ताने लोक आपापल्या घरात आणि ठिकठिकाणी ख्रिसमस ट्री तयार करून बसवतात. अशा प्रसंगी तुम्ही तुमच्या खास मित्राला किंवा जवळच्या व्यक्तीला रोपे भेट देऊ शकता. इनडोअर आणि आउटडोअर अशा दोन्ही प्रकारच्या वनस्पती बाजारात उपलब्ध आहेत. तुमच्याकडे विशिष्ट प्रकारची वनस्पती असल्यास, तुम्ही ती ऑनलाइनही ऑर्डर करू शकता.

हे ही वाचा:

THANE: आता एसटी महामंडळाचे तिकीट DIGITAL स्वरुपात, सुट्ट्या पैशांची चिंता मिटणार

THANE: भिवंडीतील अपघातात दोघांचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरु

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss