Saturday, July 27, 2024

Latest Posts

CHRISTMAS 2023: सणासुदीच्या काळात DIABETES नियंत्रित ठेवण्यासाठी काय कराल?

सणासुदीच्या काळात निरोगी राहण्यासाठी शरीरामधील ग्लुकोज यंत्रणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या सूचनांचे पालन केले पाहिजे ते आपण जाणून घेऊया. कोणत्याही कार्यक्रमात जाण्यापूर्वी काय खाणार, याची तयारी करूनच त्यानुसार नियोजन करा. फॅट्स, साखर व मीठ यांचे सेवन मर्यादित करा आणि कर्बोदकांच्या सेवनावर लक्ष ठेवा. दिवसभरात थोड्या प्रमाणात जेवण करा. मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी आहार संतुलित आणि पौष्टिक राहिल याची खात्री करा. डॉक्टर किंवा आहार तज्ञांचा सल्ला घ्या.  तसेच, जेवण सोडून इतर कोणत्याही खाद्य पदार्थाचे मनसोक्त सेवन करू नका. कारण; यामुळे रक्तातील शर्करांचे  प्रमाण कमी-जास्त होऊ शकते.

सुट्टीच्या दिवसात तुमची लाईफस्टाईल आणि आहारामध्ये बदल होतात. ज्यामुळे नियमित पाणी रक्तातील शर्करांच्या प्रमाणावर देखरेख ठेवणे आवश्यक ठरते. स्टाईल सिस्टम सारखेच मॉडर्न डिव्हाइस जवळ असल्यास तुम्हाला यावर देखरेख ठेवण्यास मदत होऊ शकते. फिंगरप्रिफसाठी सुलभ व वेदना रहित पर्याय म्हणून हे डिवाइस वेअरेबल सेंसर वापरतात ज्यामुळे तुम्हाला रक्तातील शर्करांच्या प्रमाणावर लक्ष ठेवण्यास मदत होते. सुट्टीच्या काळात झोपेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो.  सर्व मित्र किंवा कुटुंबसोबत असेल तर झोपेचे गणित बिघडतं. पण अशावेळी, तुमच्या वेळेनुसार झोपणे फायदेशीर ठरू शकेल. वेळ काढून झोपेबद्दल वेळापत्रक तयार करून दिवसातून सात ते आठ तास झोप मिळेल यासाठी प्रयत्न करा. यापेक्षा जास्त प्रमाणात झोप घेतली तर, इन्सुलिन प्रतिरोध वाढू शकतो.

 

यासोबतच, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्यायाम. व्यायामाला कोणताही पर्याय नाही. जर व्यायामाचे योग्य सूत्र अवलंबले तर बरेच आजार कमी होण्यास मदत होऊ शकेल. सणासुदीच्या काळात एकाच जागेवर जास्त बसून न राहता नातेवाईक किंवा मित्र मंडळीसोबत मोकळ्या हवेत फिरायला जा. शक्य होईल तसे चालण्यावर भर द्या. यासोबतच, व्यायाम करायला प्राधान्य द्या. यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकेल. तर अशाप्रकारे, सुट्टीच्या दिवसांमध्ये तुम्ही झोप, व्यायाम आणि योग्य आहार घेतला तर तुमचे आजारपण नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकेल.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss