जालना जिल्ह्यातील धनगर समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. अंबड तालुक्यातील धुळे-सोलापूर महामार्गावरती धनगर समाजाच्या वतीने शनिवारी रात्रीच्या सुमारास टायर जाळून आंदोलन करण्यास सुरुवात केली. जामखेड येथे आंदोलकांनी टायर पेटवून आंदोलनास सुरुवात केली. आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर येथे झालेल्या चप्पलफेक प्रकरणी आक्रमक झालेल्या धनगर समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
गोपीचंद पडळकर यांच्यावर करण्यात आलेल्या दगडफेक प्रकरणी राज्यभरात धनगर समाज आक्रमक होत आहे. याचे पडसाद जालन्यात देखील उमटायला सुरुवात झाली आहे. रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास जामखेड फाटा येथील धुळे-सोलापूर महामार्गावरती धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आंदोलकांनी महामार्गावरच टायर पेटवून दिले. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रंगा लागल्या होत्या. याची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले आणि रस्ता वाहनांना मोकळा करून दिला.
हे ही वाचा:
कुणबी नोंदींची आकडेवारी जाहीर करू नका; शिंदे समितीची अधिकाऱ्यांना सूचना
ठाण्यातील कासारवडवली आनंदनगरमध्ये तरुणाची तलवारीने वार करून हत्या