Saturday, April 27, 2024

Latest Posts

आहारात तूपाचे सेवन केल्याने शरीराला होता फायदे

अनेकजण जेवणात तूपचा(ghee) वापर करतात.

अनेकजण जेवणात तूपचा(ghee) वापर करतात. तूप आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे. सकाळी उठून उपाशीपोटी आपण एक चमच तूप खाल्ले तर पचनक्रिया व्यवस्तीत राहते. त्याच बरोबर पोट साफ करायला मदत होते. शरीरातील काही निष्क्रिय घटक आहेत. ते युरीनद्वारे बाहेर पडतात. तसेच सौंदर्य वाढवायला मदत होते. हाडांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी रोजच्या आहारात तूपाचे सेवन केल्याने अनेक फायदे होतात. तूपामध्ये हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन-D(Vitamin-D), व्हिटॅमिन-K (Vitamin-K) आणि कॅल्शिअमचे (calcium) प्रमाण भरपूर असते. यामुळे हाडे बळकट राहतात.

आपल्या केसांसाठी तुप खूप उपयोगी आहे. केसांच्या वाढीसाठी तूप खूप फायदेशीर आहे. तूपामध्ये व्हिटॅमिन अ, ब, ई, क हे घटक असल्यामुळे हे सर्व घटक आपल्या शरीरातील सर्वच संस्थांना अतिशयफायदेशीर ठरतात. तसेच तूपाचे सेवन केल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते.आयुर्वेदार्थ जून तुप खूप गुणकारी असते. उच्च किंवा कमी रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांसाठी तुप खूप फायदेशीर आहे. हे शरीरातील कोलेस्ट्रॉल(Cholesterol) नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.तूपाचे सेवन केल्याने वजन वाढत नाही आणि खराब कोलेस्ट्रॉलही वाढत नाही.

अति प्रमाणात तूप खाल्ल्याने रक्तातील वाईट असे LDL प्रकारचे कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते. LDL कोलेस्टेरॉलमुळे हृदयाचे विकार(Heart disorders), हार्ट अटॅक(Heart attack), हाय ब्लडप्रेशर(High blood pressure) , पक्षाघात (Paralysis) यांसारख्या गंभीर समस्या जर असतील तर तुप खाणं टाळावे. जर तुम्ही १चमच तूप गरम पाण्यामधून घेतले तर शरीरातील संस्था या क्रियाशील होतात. तुपाचे सेवन केलयास ३० ते ४० मिनटे चांगला व्यायाम (वर्कआऊट) करायला पाहिजे. लहानमुलांना डाळ भाता वर तूप टाकून दिल्यास हाडे मजबुत होतात आणि स्मरणशक्ती पण चांगली राहते.

हे ही वाचा:

पुण्यातील बैठकीत अजित पवारांनी जाहीर केले पहिल्या उमेदवाराचे नाव

शिंदे गटाला जेवढ्या जागा तेवढ्याच आम्हाला द्या, छगन भुजबळांची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss