Saturday, April 27, 2024

Latest Posts

पुण्यातील बैठकीत अजित पवारांनी जाहीर केले पहिल्या उमेदवाराचे नाव

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार अजित पवार यांनी घोषित केला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार अजित पवार यांनी घोषित केला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून (Raigad Loksabha) पुन्हा एकदा सुनील तटकरे ( Sunil Tatkare) यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे अजित पवार यांनी आपल्या पहिल्या उमेदवाराचे नाव घोषित केले आहे. या बैठकीत तटकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. पुढे अजित म्हणाले, २८ तारखेला महायुतीचा संपूर्ण फॉर्म्युला जाहीर केला जाईल.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार असे अजून स्पष्ट झालेले नाही. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बारामती, शिरुर, रायगड आणि सातारा या ठिकाणी त्यांनी जागेसाठी आग्रह धरला आहे. आज अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बारामती, शिरूर, सातारा ,धाराशिव, नाशिक, रायगड परभणी या लोकसभेतील जागा संदर्भात चर्चा करण्यात आली. तर येत्या २ दिवसांत परभणीचा उमेदवार ठरवला जाणार आहे. बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचच लढवणार, असल्याचा ठराव एकमताने मंजूर झाला आहे. आज पुण्यात झालेल्या बैठकीमध्ये बारामती, शिरूर, सातारा ,धाराशिव, नाशिक, रायगड, परभणी या लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा करण्यात आली. तसेच परभणीचे उमेदवार दोन दिवसात ठरणार आहेत. त्यामुळे महादेव जानकरांना पाठिंबा ही केवळ अफवा असून विरोधकानी पसरवली आहे, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.

पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अजित पवार म्हणाले, एकत्र चर्चा करून महायुतीच्या जागा वाटपावर चर्चा झाली आहे. २८ तारखेला मुंबईमध्ये मुंबईत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी पत्रकार परिषद घेऊन उमेदवार जाहीर करणार आहोत. रायगडमधून सुनील तटकरे निवडणूक लढविणार आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील २०वर्षांपूर्वी आमच्या पक्षातून शिवसेनेत गेले होते. ते आमचे शिरुरचे उमेदवार असणार आहेत. इतर उमेदवारांची नावे २८ तारखेला जाहीर करण्यात येतील. कारण नसताना पत्रकारांनी राष्ट्रवादीला तीन किंवा चारच जागा लढविण्यास मिळणार अशा खोट्या बातम्या चालवल्या होत्या. प्रत्येक मंत्र्यावर एका लोकसभा मतदारसंघाची तर प्रत्येक आमदारावर एका विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी असते. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे आहे. बारामतीचा उमेदवार २८ तारखेला जाहीर करतो. तुमच्या मनातील उमेदवार जो उमेदवार आहे, तोच आमचा उमेदवार असेल.सातारची जागा अजून जाहीर झालेली नाही. उदयनराजेंना सांगण्याचे काम भाजपचे नेते करतील.शिवतारेंबाबत नो कॉमेंट्स, असे अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा:

शिंदे गटाला जेवढ्या जागा तेवढ्याच आम्हाला द्या, छगन भुजबळांची मागणी

खैरे दानवे वाद अखेर मिटला, वाद संपल्यानंतर अंबादास दानवेंनी केली मोठी घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss