Thursday, May 16, 2024

Latest Posts

उन्हाळ्यात पुदिना-आल्याचे पाणी ठरेल गुणकारी, पण बनवायचे कसे?

आलं हे पचन सुधारण्यास मदत करते तर पुदिना हा थंडावा राहण्यासाठी उपयुक्त ठरत असतो. उन्हाळयात आल्याचा वापर केल्यावर गॅसची समस्या दूर होण्यसाठी मदत होते. पुदिना शरीर ताजेतवाने ठेवण्यासाठी मदत करते. पुदिना आणि आल्याचे पाणी सेवन केल्यास शरीराला हायड्रेटेड राहण्यास मदत करते.

साहित्य –

१. मध्यम आकाराचा १ लिंबू
२. आल्याचा १ छोटा तुकडा
३. मूठभर पुदिन्याची पाने
४. पाणी २ लिटर
५. आवश्यकतेनुसार बर्फाचे तुकडे

कृती –

१ आल्याचा तुकडा घेऊन आणि तो नीट धुऊन घ्या. पुदिन्याचे पाने नीट स्वच्छ करा. त्यानंतर १ लिंबू घ्या व त्या लिंबाचे गोल असे बारीक तुकडे करून घ्या. आले धुऊन त्याचे साल सोलून बारीक कापून घ्या. एका भांड्यामध्ये लिंबाचे तुकडे, आल्याचे तुकडे, पुदिन्याची पाने, पाणी आणि बर्फाचे तुकडे सर्वकाही एकत्र करून फ्रिजरमध्ये २ तास थंड होण्यासाठी ठेवून द्या. हे पाणी बाटलीमध्ये पण ठेवू शकता. हे बाटली कामाच्या ठिकाणी किंवा प्रवास करताना सोबत घेऊन जाऊ शकता. हे पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत होईल.

हे ही वाचा:

नाश्त्यासाठी बनवा “हा” कुरकुरीत पदार्थ

घरच्या घरी बनवा बीटरूट जाम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss