Saturday, April 27, 2024

Latest Posts

उन्हाळयामध्ये केळी खाल्ल्याने शरीराला होतात आरोग्यदायी फायदे

केळी(banana) ही वर्षभर बाजारात उपलब्ध असतात.

केळी(banana) ही वर्षभर बाजारात उपलब्ध असतात. चवीप्रमाणे केळी आरोग्यासाठी चांगली असतात. केळीमध्ये अनेक महत्वाचे गुणधर्म आढळून येतात.केळ्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. गोड, पिवळ्या रंगाची केळी बाजारात सहज उपलब्ध होतात. हिरवी केळी ही भाजीसाठी वापरली जातात. उन्हाळ्यात केळी खाल्याने शरीराला अनेक फायदे होतात.केळी खाल्ल्याने आरोग्यासाठी कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.

उन्हाळा ऋतूमध्ये केळीचे सेवन केल्याने अनेक आजारानंपासून दूर राहता येते. मॅग्नेशियम(magnesium), पोटॅशियम(Potassium) , व्हिटॅमिन बी6 (Vitamin B6) आणि इतर अनेक पोषक तत्वे केळीमध्ये आढळतात जे पचन आणि हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात.उन्हाळयात काही लोकांना पचनाच्या समस्या जाणवतात. या ऋतूत केळीचे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते. पचनक्रिया सुधारून अनेक गंभीर आजारांना बळी पडण्यापासून वाचवण्यास मदत होते. उष्णतेमुळे लोकांना लूज मोशनचा त्रासही होतो. अश्यावेळी केळीचं सेवन केल्यास तात्काळ आराम मिळतो. मीठ मिसळून केळी खाल्ल्यास आराम मिळतो. यासोबतच केळीसोबत साखरेचे काही दाणे खाल्ल्यानेही तुम्हाला फायदा होतील.केळी रक्त पातळ ठेवण्यास मदत करते. रक्ताभिसरण सुधारते.

केळ्यामध्ये मॅग्नेशियम असते ज्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी झाले की रक्तवाहिन्यांमधील रक्ताभिसरणही सुरळीत होते.केळी ही बद्धकोष्ठतेच्या रुग्णांसाठी संजीवनी औषधी वनस्पतीसारखे आहे.केळीचे रोज सेवन केल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्यपासून आराम मिळते. यासाठी केळी सोबत दुध पिले जाते. रोज रात्री झोपण्यापूर्वी सेवन केल्यास बद्धकोष्ठतेवर फायदा होतो. रक्तदाब आणि हृद्यविकाराचा झटका टाळण्यासाठी पोटॅशियम उपयुक्त केळी उपयोगी आहे. ज्या लोकांना मधुमेह (diabites) आहे. त्यांनी फार केळी खाऊ नये. इतर फळांच्या तुलनेत केळीमध्ये साखरचे प्रमाण जास्त असते. केळी शरीराला उच्च उष्मांक ऊर्जा प्रदान करते. केळयांन मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. त्यामुळे आतड्यांचे काम सुधारते. केळयांमध्ये फायबर आहे त्यामुळे केळी खाल्ल्यावर पोट भरते.

हे ही वाचा:

पुण्यातील बैठकीत अजित पवारांनी जाहीर केले पहिल्या उमेदवाराचे नाव

अयोध्येत पार पडली ४९५ वर्षांनी होळी, राम मंदिरात भाविकांनी लुटला होळीचा आनंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss