Saturday, April 27, 2024

Latest Posts

अयोध्येत पार पडली ४९५ वर्षांनी होळी, राम मंदिरात भाविकांनी लुटला होळीचा आनंद

अयोध्यात ५०० वर्षेनंतर प्रभू श्री रामांचे भव्य राम मंदिर तयार करण्यात आले आहे.

अयोध्यात ५०० वर्षेनंतर प्रभू श्री रामांचे भव्य राम मंदिर तयार करण्यात आले आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. अयोध्यात तब्बल ४९५ वर्षांनंतर होळी साजरा करण्यात आली. काल देशभरात सगळीकडे होळीचा मोठा उत्साह होता. होळी सणाच्या दिवशी एकमेकांना रंग लावून होळी साजरा केली जाते. अशीच होळी काल अयोध्येत साजरी करण्यात आली. तसेच अयोध्येत राहणाऱ्या राम कृपाल यांनी सांगितले, राम मंदिरात होळी खेळताना खूप आनंद झाला. असा शुभ दिवस खूप दिवसानंतर आला. यापूर्वी रामलल्ला तंबूत होते. त्यामुळे होळी खेळणे शक्य झाले नव्हते. परंतु आता हा एक अतिशय शुभ प्रसंग आला आहे, असे राम कृपाल यांनी सांगितले.

अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानंतर पहिल्यांदाच होळी साजरा करण्यात आली.
अयोध्येमध्ये तब्ब्ल ४९५ वर्षांनी होळी साजरी झाली.अयोध्यावासींनी या सणाचा आनंद अनेक वर्षांनी लुटला आहे. अयोध्येमध्ये होळी खेळण्यासाठी देशभरातून लाखो भाविक आले होते .
होळी साजरा करण्यासाठी रामल्ललाची मूर्ती सजवण्यात आली होती. मूर्तीवर गुलाल लावण्यात आला होता. गुलाबी वस्त्र परिधान केलेली रामलल्लाची मूर्ती अधिक आकर्षक दिसत होती.
अयोध्येत साजरा करण्यात आलेली होळी खूप खास होती. मंदिरामध्ये सगळीकडे अबीर, गुलालाने होळी खेळण्याची परवानगी देण्यात आली होती.
होळी सणानिमित्त राम मंदिरात ५६ प्रकारच्या पदार्थांचा भोग लावण्यात आला.तसेच पुजाऱ्यांनी अनेक होळीची गाणी देखील गायली.

Latest Posts

Don't Miss