Saturday, July 27, 2024

Latest Posts

भारतातच घ्या Mini Switzerland चा अनुभव, एक दोन नाही तर तब्ब्ल चार…

फिरायला जायला कोणाला नाही आवडत? प्रत्येकाला कुठे ना कुठे फिरायला जायला हे आवडतच असते. काही लोक वर्षातून एकदा तरी फिरायला जातच असतात तर काही लोक वारंवार फिरायला जात असतात.

फिरायला जायला कोणाला नाही आवडत? प्रत्येकाला कुठे ना कुठे फिरायला जायला हे आवडतच असते. काही लोक वर्षातून एकदा तरी फिरायला जातच असतात तर काही लोक वारंवार फिरायला जात असतात. बाहेर फिरायला जाणं, विविध , नव्या जागा बघणं कोणाला आवडत नाही. बरेच जण असे असतात, जे वर्षभरात एकदा किंवा त्यापेक्षाही अधिक वेळेस बाहेर फिरायला जातात. पर्यटनामुळे मन तर फ्रेश होतंच, पण नव्या जागा, तिथली संस्कृतीही पहायला मिळते, ज्ञानात भर पडते ती तर वेगळीच. आणि त्यातच फिरायला जायचं ठिकाण हे स्वित्झर्लंड असेल तर त्याची बात काही औरच…

स्वित्झर्लंड युरोप खंडाच्या मध्य पश्चिम भागात स्थित असून त्याच्या भोवताली जर्मनी, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रिया व लिश्टनस्टाइन हे देश आहेत. स्वित्झर्लंडचा दक्षिण व आग्नेय भाग आल्प्स पर्वताने व्यापला आहे. ऱ्हाइन व ऱ्होन ह्या युरोपामधील दोन प्रमुख नद्यांचा उगम स्वित्झर्लंडमध्ये होतो. स्वित्झर्लंड हा पर्यटकांना मंत्रमुग्ध करणारा देश आहे. नयनरम्य गावं, सुंदर नद्या आणि तलाव, हायकिंग असं सर्वकाही स्वित्झर्लंडमध्ये पहायला आणि अनुभवायला मिळतं. पण स्वित्झर्लंड जायला खूप खर्च लागतो म्हणून काही लोक तिथे जाणं टाळतात. पण तुम्हाला माहितीये का, आपल्या भारतातसुद्धा एक दोन नाही तर असे चार मिनी स्वित्झर्लंड आहेत. आणि या चारही ठिकाणी तुम्ही अगदी बजेट फ्रेंडली फिरू शकतात.

खज्जियार (Khajjiar) – हिमाचल प्रदेशमधील ही अत्यंत सुंदर जागा आहे. हे एक छोटंसं गाव असून भारतातील मिनी स्वित्झर्लंड्सच्या यादीत हे अग्रस्थानी येतं. खज्जियार पठाणकोट रेल्वे स्टेशनपासून सुमारे ९५ किमी आणि कांगडा जिल्ह्यातील गग्गल विमानतळापासून १३० किमी अंतरावर आहे. खज्जियार हे लोकप्रिय खज्जी नागा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे जे सर्प देवाला समर्पित आहे ज्यावरून हे नाव घेतले गेले असे मानले जाते . खज्जियार तलाव पाहिल्यानंतर तुम्हाला चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या सुरेख दृश्यांची आठवण होईल.

औली (Auli) – भारतातील दुसरा मिनी स्वित्झर्लंड हा उत्तराखंडमधील औली शहर आहे. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील ही जागा पर्यटकांसाठी खूप प्रसिद्ध आहे. याला गढवालीमध्ये औली बुग्याल असेही म्हणतात, याचा अर्थ “कुरण” आहे. जगात कुठेही आढळणाऱ्या फुलांच्या प्रजातींची संख्या या खोऱ्यात आहे. बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी इथे हजारो पर्यटक येत असतात. इथली प्रत्येक जागा फोटोजेनिक आहे. इथूनच कैलाश मानसरोवरची यात्रा सुरु होते.

जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmi) – भारतातील मिनी स्वित्झर्लंडचा विषय असेल आणि त्यात जम्मू-काश्मीरचा उल्लेख नसेल, असं होऊच शकत नाही. हिवाळ्यात इथे पांढऱ्याशुभ्र बर्फाची चादर पांघरलेली पहायला मिळते. बॉलिवूडच्या असंख्य चित्रपटांचं शूटिंग याठिकाणी होतं. श्रीनगर, गुलमर्द ही पर्यटकांची खास आकर्षणं आहेत. काश्मीर हे सुंदर डोंगरांसाठी प्रसिध्द आहे. म्हणून त्याला स्वर्ग म्हणतात. काश्मीरला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात.

मणिपूर (Manipur) – जर तुम्ही स्वित्झर्लंडला फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर तिथे प्रचंड पैसा खर्च करण्यापेक्षा तुम्ही मणिपूरचाही पर्याय निवडू शकता. मणिपूर हेसुद्धा भारतातील स्वित्झर्लंड म्हणूनच ओळखलं जातं. इथलं सौंदर्य संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. कांगलेपाटी, लोकटक तलाव ही पर्यटनस्थळं विशेष प्रसिद्ध आहेत.

हे ही वाचा:

Manoj Jarange Patil यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्यांची प्रतिक्रिया म्हणाले…

सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही; जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss