Friday, May 17, 2024

Latest Posts

रात्री झोप लागत नाहीये ? हे पदार्थ रात्री खाणं टाळा

रोज 8 तासाची झोप घेणे आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. असे न झाल्यास तुम्हाला गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते.

मुंबई : आजकाल धावपळीच्या जीवनात अनेकांना रात्रीची झोप लागत नाही. अशी तक्राही अनेक जण करतात. त्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. रात्री नीट झोप न लागणे हे चांगले नाही. त्यामुळे अनेक शारीरिक व मानसिक त्रासाला आमंत्रण मिळू शकते. रोज 8 तासाची झोप घेणे आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. असे न झाल्यास तुम्हाला गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. काहीवेळा सगळं सुरळीत सुरू असताना देखील काहींना रात्रीची झोप लागत नाही. अनेक उपाय करून ही समस्या सुटत नाही. यामागे तुमच्या चुकीच्या वेळी खाण्याच्या सवयी ही असू शकतात. हो रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही हे ठराविक अन्नपदार्थ खात असाल तर तुमची झोप उडायची दाट शक्यता असते. चला तर पाहूया काय आहेत त्या गोष्टी ?

हेही वाचा :

आलिया आणि रणबीर ला जुळी मुलं ?

बर्गर आणि पिझ्झा –
अनेकांना फास्ट फूड खाण्याची सवय असते. पण ही सवय वेळी अवेळी असेल तर मात्र त्याचा परिणाम तुमच्या झोपेवर होऊ शकतो. बर्गर, पिझ्झा यांसारखे पदार्थ कधीही खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. रात्री झोपण्यापूर्वी खाणं तर आणखीनच वाईट. मैदा, वेगवेगळे सॉस आणि चीझ वापरून बनवलेला पिझ्झा शरीरातील जळजळीला कारणीभूत ठरतो. वजन वाढणे, मधुमेह यासह उच्च रक्तदाब असे अनेक आजार यामुळे होऊ शकतात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी पिझ्झा खाणं टाळा.

मद्यपान –
दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी आणि शांत झोप लागावी यासाठी अनेक जण रात्री झोपण्यापूर्वी मद्यपान करतात. मद्यपान करणे आरोग्यासाठी घातकच असते. या सवयीमुळे झोप तर लागत नाहीच पण त्याचा परिणाम आरोग्यावरही होतो. त्याचबरोबर वजन वाढणे तसेच मधुमेह होण्याचा धोका संभवतो.

डार्क चॉकलेट –
अनेकांना रात्री जेवल्यानंतर चॉकलेट खाण्याचे क्रेविंग्ज होतात. त्यात जर तुम्ही गोड खाणं टाळण्यासाठी डार्क चॉकलेट खात असाल तर त्यात जास्त प्रमाणात कॅफेन आणि उत्तेजक पदार्थ असतात. ज्यामुळे हृदय अधिक कार्य करू लागते. त्याचबरोबर तुमचा मेंदूही ॲक्टिव्ह होतो. दिवसा जरी हे फायदेशीर असले तरी रात्री शांत झोप हवी असेल तर हे डार्क चॉकलेट टाळलेलेचं बरं.

पास्ता –
कॅलरीज भरलेला पास्ता खाल्ल्याने तुमचं पोट तर भरेल पण तुमची झोप आणि आरोग्य दृष्टीने ते चांगले नाही. पास्तामधील कार्बोहायड्रेट हानिकारक असतात, जे कोलेस्ट्रॉल, बीपी आणि हृदयरोगासाठी कारणीभूत ठरू शकते. पास्ता रात्री खाल्ल्याने ॲसिडीटी आणि गॅसेसचा त्रास होऊ शकतो.

Latest Posts

Don't Miss