Saturday, April 27, 2024

Latest Posts

शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होत Amol Kolhe यांनी घेतले महाराजांचे दर्शन

विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवेंद्र खिलारी यांच्या निवासस्थानी अमोल कोल्हे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी घेतलेल्या संघर्षाच्या भूमिकेला सर्वांचा पाठिंबा आहे, आशीर्वाद आहे ही बाब आम्हाला अधिक जोमाने लढण्याची शक्ती देणारी असल्याचे यावेळी अमोल कोल्हे म्हणाले.
या भेटीदरम्यान अमोल कोल्हे यांनी सर्व माता भगिनींचे, ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन सर्वांसोबत संवाद साधला.
यावेळी खिलारी परिवाराच्या वतीने अतिशय आपुलकीने औक्षण करून अमोल कोल्हे यांचे स्वागत करण्यात आले.
गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने जुन्नर व पंचक्रोशीतील असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री मारूती मंदिरात जाऊन अमोल कोल्हे यांनी दर्शन घेतले.
श्री हनुमान हे शक्तीचे स्रोत आहेत, न्यायासाठी लढण्याची प्रेरणा आहेत. आम्हालाही स्वाभिमानाचा हा लढा लढण्यासाठी शक्ती मिळावी अशी मनोभावे प्रार्थना यावेळी अमोल कोल्हे यांनी केली.

Latest Posts

Don't Miss