Saturday, April 27, 2024

Latest Posts

निर्मला सीतारमण यांनी केला मोठा खुलासा, लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी…

सध्या देशभरात सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहत आहेत.

सध्या देशभरात सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. अश्यातच केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांना भारतीय जनता पक्षाचा (भाजप) लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र त्यांनी हा प्रस्ताव नाकारला आहे. यामागे असलेले कारण देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. आपल्याला लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक पैसे नसल्याचे निर्मला सीतारमण यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले आहे. त्यांनी एका कार्यक्रमा दरम्यान, ही माहिती दिली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (J. P. Nadda) यांनी त्यांना आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) किंवा तामिळनाडूमधून (Tamil Nadu) आगामी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी पर्याय दिला होता. मात्र त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे.

निर्मला सीतारमण एका कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या, पक्षाने मला लोकसभा निवडणूक लढण्याबाबत विचारणा केली होती. मला आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांचा पर्याय देण्यात आला होता. त्यांनी दिलेल्या पर्यायानंतर मी एक आठवडा १० दिवस विचार केला. विचार केल्यानंतर मी निवडणूक लढण्यासाठी नकार दिला. आंध्र प्रदेश असो किंवा तामिळनाडू माझ्याकडे निवडणूक लढण्यासाठी एवढा पैसा नाही, असे निर्मला सीतारमण म्हणाल्या. देशाच्या अर्थमंत्र्यांकडे निवडणूक लढवण्यासाठी पुरेसा पैसे का नाही? असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर निर्मला सीतारमण म्हणाल्या, भारताचा एकत्रित निधी (अर्थखात्याचा निधी) हा माझा वैयक्तिक निधी नाही. माझा पगार, माझी कमाई आणि माझी बचत माझी आहे. भारताचा एकत्रित निधी माझा नाही,असे निर्मला सीतारमण म्हणाल्या.

देशभरात केंद्रामध्ये असलेल्या मंत्र्यांकडील संपत्ती पाहून सर्वसामान्य नागरिकांना धक्का बसतो. मात्र असून देखील इतर मंत्र्यांच्या तुलनेत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे खूप कमी संपत्ती आहे. त्यांच्याकडे सुमारे १.३४ कोटी रुपयांची संपत्ती आहे. सीतारमण आणि त्यांचे पती यांच्या नावावर असलेल्या घराची किंमत ९९.३६ लाख रुपये आहे तर बिगर शेती जमीन १६.०२ लाख रुपयांची आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांचे मासिक वेतन ४,००,००० रुपये इतके आहे.

हे ही वाचा:

नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चू कडूंनी केले मोठे विधान, आम्ही राणा यांचा..

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या पारड्यात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss