Saturday, May 18, 2024

Latest Posts

जर उन्हाळ्यात राहायचं असेल फ्रेश तर ही स्मुदी नक्की ट्राय करा

उन्हाळ्याच्या दिवसात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी अनेक फळांचे सेवन केले जाते. प्रतिकारशक्ती उत्तम ठेवण्यासाठी ताडगोळा या फळाचे (Ice Apple Fruit) चे सेवन करा. हे फळ समुद्रकिनारी तामिळनाडू आणि महाराष्टाच्या पूर्व भागात मिळते. उन्हाळाच्या दिवसात हे फळ बाजारात जास्त विकायला येते. हे फळ दिसायला नारळासारखे असते. जेलीसारखे मऊमऊ आणि रसदार असते आणि चवीला पण उत्तम लागते. त्वचेवर खाज, घामोळ्या यावर उत्तम पर्याय म्हणजे ताडगोळ्याचे सेवन. शरीर जर हायड्रेड राहिले नाही त्वचेच्या समस्या सुरु होतात. ताडगोळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. त्यामुळे या फळाचे सेवन केल्यास शरीर हायड्रेट राहते. ताडगोळा खाल्ल्यावर पोट लगेच भरते आणि भूक पण जास्त लागत नाही. याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी करू शकता. उन्हात जाऊन आल्यांनतर चेहऱ्याची जळजळ होत असेल तर ताडगोळ्याचे पाणी चेहऱ्यावर लावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या.

सोललेले ताडगोळे घ्या नंतर त्याला मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट करा. एका ग्लासमध्ये सब्जा घ्या आणि त्यामध्ये ताडगोळ्यांची पेस्ट टाका. नंतर त्यामध्ये बर्फाचे तुकडे आणि दूध टाका. तयार आहे ताडगोळ्याची स्मुदी. ही स्मूदी या उन्हाळ्यात नक्की ट्राय करा. यामुळे त्वचा आणि शरीर हायड्रेट राहण्यास मदत होईल.

हे ही वाचा:

महादेव बॅटिंग अँप प्रकरणात ”या” अभिनेत्याला अटक

SRH विरुद्ध मनासारखा स्कोर बनवता आला नाही, २०० हुन जास्त धावा ठोकूनही Ruturaj Gaikwad नाखूश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss