नवीन वर्ष म्हणजे पार्टी, मजा आणि उत्साह… पण जर आपल्या काही घरगुती पदार्थ खाण्यासाठी दिले तर ते आपल्याला आवडत नाही. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षात आपल्या जेवणात काही नवीन पदार्थ असणे आवश्यक आहे. बिघडलेल्या जीवनशैलीचा परिणाम माणसांच्या जीवनात होत आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल यांसारख्या वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढला आहे. भारत सरकार देखील बऱ्याच काळापासून आहारात बाजरीचा समावेश करण्याची विनंती करत आहे. दुधाप्रमाणेच ते सुपरफूड म्हणून गणले जातात. प्रतिकारशक्ती वाढवण्यापासून ते व्हिटॅमिनची कमतरता पूर्ण करण्यापर्यंत बाजरी खाण्याचे अनेक फायदे आहेत.
कमी फॅटयुक्त ग्रीक दही
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांमध्ये ग्रीक दही खूप लोकप्रिय आहे. त्यात लॅक्टोजचे प्रमाणही कमी असते. ग्रीकदह्यामध्येकॅल्शियम(Calcium),पोटॅशियम(Potassium),प्रोबायोटिक्स(Probiotics),फॉस्फरस(Phosphorus),प्रथिने(protein),कॅलरीज(Calories),व्हिटॅमिन बी १२ (vitamin)आणि आयोडीन (Iodine) यासह अनेक गोष्टी असतात.
रताळे
बटाट्याऐवजी रताळ्यांचा आहारात समावेश करा. कारण बटाट्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखर वाढण्याचा धोका आहे. त्यात बीटा कॅरोटीन नावाचे संयुग असते. त्यामुळे हृदयाच्या आजारांपासून बचाव होतो.
नट्स सॅलड
नवीन वर्षात निरोगी जीवनशैलीचा संकल्प करू. तुमच्या सॅलड किंवा स्नॅक्समध्ये नट आणि बियांचा समावेश करण्याचे सुनिश्चित करा. त्यातील हेल्दी फॅट्स शरीरासाठी फायदेशीर असतात. अक्रोड, बदाम आणि काजू अनेक जीवनसत्त्वे देतात, जे शरीराला अनेक प्रकारे निरोगी बनवतात.
हे ही वाचा:
“संपूर्ण विश्वातील सर्वात महान मनुष्य,रितेशच्या वाढदिवसानिमित्त जेनेलियाची खास पोस्ट