Friday, May 3, 2024

Latest Posts

उन्हाळ्याच्या दिवसात ‘या’ फळाचा करा रोजच्या आहारात समावेश

राज्यभरात उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे.

राज्यभरात उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. या उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला जास्त पाण्याची गरज असते. उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होते. या उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला ताकद आणि ऊर्जा देण्यासाठी कलिंगड हे फळ तुम्ही खाऊ शकता. कलिंगड हे उन्हाळी सुपरफूड आहे. कलिंगड मध्ये पुरेशा प्रमाणात पाणी असते, यामुळे या दिवसात कलिंगड जास्त प्रमाणात खाल्ले जाते. कलिंगड हे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी कलिंगड उपयुक्त ठरते. तर उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड खाल्याने काय फायदे होतात ते जाणून घेऊया.

कलिंगड मध्ये पुरेशा प्रमाणात पाणी आढळून येते. यामुळे त्वचेला हायड्रेशन आणि पोषण मिळते. कलिंगड तुम्ही खाण्यासोबत तुम्ही ते तुमच्या त्वचेला देखील लावू शकता. त्वचेला लावण्याने त्वचा निरोगी आणि चमकदार होण्यास मदत होते. कलिंगडमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळून येते ज्यामुळे शरीराला आणि त्वचेला अनेक फायदे होतात. यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते तर निरोगी त्वचा टोन राखते. कलिंगड हे सूर्य किरणांपासून वाचण्यास मदत करते. उन्हाळ्यात रोजच्या आहारात कलिंगडचे सेवन केल्याने त्वचा तरूण आणि ताजेतवानी राहते.

कलिंगडमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट आढळून येतात. जे कोलेजन उत्पादीत करण्यास मदत होते. त्वचेवरील बारीक रेषा आणि सुरकुत्या वेळेपूर्वी दिसण्यापासून थांबू शकते. कलिंगड हे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. त्वचेवरील छिद्र भरून त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्याचे काम करते. कलिंगडमध्ये व्हिटॅमिन ए असते. त्याचा वापर केल्याने त्वचा तेलकट न होता मॉइश्चराइज आणि हायड्रेट राहण्यास मदत होते.

हे ही वाचा:

Athiya Shetty आणि KL Rahul यांना चिमुकल्याची चाहूल?

घरच्या घरी बनवा बीटरूट जाम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss