Thursday, May 2, 2024

Latest Posts

लहान मुलांच्या आहारात ‘या’ पदार्थाचा समावेश केल्याने शरीराला होतात फायदे

रताळी (sweet potato) हे एक कंदमुळ आहे.

रताळी (sweet potato) हे एक कंदमुळ आहे. लहानमुलांना रोजच्या आहारात रताळी खायला दिल्याने मुलांच्या शरीराला अनेक फायदे होतात. चवीला गोड आणि पोषकतत्व रताळ्यांमध्ये आढळून येते. याशिवाय रताळ्यामध्ये पोटॅशियम(Potassium), कॅल्शियम(Calcium), व्हिटॅमिन ए, सी आणि बी-कॉम्पलेक्स (B-complex) हे घटक सुद्धा आढळतात. जन्माला आल्यावर बाळ ६ महिने हे आईच्या दुधावर असते. या काळात बाळाला दुसरे काहीच खाऊ देऊ नये.

बाळ ८ ते १० महिन्यांचे झाल्यावर त्याला रताळी खाऊ घालावी. अनेक बाळांना रताळी खायला आवडत नाही. त्यामुळे जबरदस्तीने रताळी भरवू नये. रताळीमध्ये व्हिटॅमिन ए असते. हे बाळाच्या निरोगी आयुष्यासाठी चांगले असते. बीटा-कॅरोटीन हे एक असे तत्व आहे. जे शरीरात व्हिटॅमिन ए बनवते. म्हणून बाळाला रताळी खायला द्यावी. शरीरातील मेटाबोलिज्म (Metabolism) नीट ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे खनिज महत्वाचे असतात.

यामुळे रताळी खूप फायदेशीर ठरतात. रताळीमध्ये खूप खनिजे असतात. रताळ्यात केवळ व्हिटॅमिन ‘ए’ सापडत नाही तर इतर प्रकारचे व्हिटॅमिन जसे की व्हिटॅमिन सी, ई, के आणि बी १ ते बी ६ तसेच बी ९ सुद्धा आढळते. रताळी खाल्याने बाळाच्या शरीरातील व्हिटॅमिनची गरज पूर्ण करतात. रताळी ही स्टार्च आणि डायटरी फायबरने समृद्ध असतात. शरीर हे स्टार्चला शुगरमध्ये रूपांतर होते. रताळी खाल्याने बाळा एनर्जी मिळते. रताळ्यामध्ये असलेले डायटरी फायबर बाळाला बद्धकोष्ठतेपासून आराम देते. रताळीची चव ही गोड असते. अनेक मुलं ती आवडीने खातात. पण काही मुलांना ती आवडत नाही. पण जर बाळ रताळी खायला टाळत असेल तर त्याचे विविध रेसिपी करून घालावी. बाळाला जर रताळी खाऊ घालत असाल तर २ दिवस वाट पाहावी जर ते आवडीने खात असेल तरच त्याला रताळी खाऊ घालणं चालू ठेवावे.

हे ही वाचा:

नाशिकमधून छगन भुजबळांना उमेदवारी मिळण्याची शक्यता; उमेदवारीसाठी माझी मागणी आणि आग्रह..

लहान मुलांना आवडेल अशी हेल्दी टेस्टी पालक आणि बीटरूट पुरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss