Thursday, February 29, 2024

Latest Posts

हिवाळ्यात या पाच ड्राय फुड्सचा खाण्यात वापर करा,शरीराला मिळेल उष्णता

प्रत्येक येणाऱ्या ऋतूत आपण आपल्या खाण्याच्या पद्धती बदलत असतो,आता हिवाळा सुरु असल्यामुळे साधारणपणे आपण थंड पदार्थ खाणं सहसा कमी करतो.

प्रत्येक येणाऱ्या ऋतूत आपण आपल्या खाण्याच्या पद्धती बदलत असतो,आता हिवाळा सुरु असल्यामुळे साधारणपणे आपण थंड पदार्थ खाणं सहसा कमी करतो.थंडी वाढत जाते तस आपण खाण्याच्या सवयीही बदलत असतो.उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात आपण आपल्या आहारात  काही गोष्टींचा समावेश करतो ज्यामुळे शरीर उबदार राहते आणि सर्दी आणि आजारांपासून आपले संरक्षण होते. हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी शरीराला उबदार ठेवणाऱ्या पदार्थांचं सेवन करा. अनेकदा तुम्ही तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना हिवाळ्यात गूळ आणि तीळ खाण्यास सांगताना ऐकले असेल. या दोन्ही गोष्टी थंडीपासून आराम देतात. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. चला तर मग जाणून घेऊयात आहारात कोणत्या 5 गोष्टींचा समावेश करायचा.

 खजूर 

हिवाळ्यात खजूर खाणं खूप फायदेशीर आहे. खजूरमध्ये व्हिटॅमिन ए आणि बी चांगल्या प्रमाणात आढळते. खजूर मुळात उष्ण असतो. ज्यामुळे थंडीत आराम मिळतो. हे आपले शरीर आतून उबदार ठेवते. त्यात फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबर देखील पुरेशा प्रमाणात आढळतात. ज्यामुळे आपल्याला अनेक आजारांपासून मुक्ती मिळते.

गूळ 

हिवाळ्यात गुळाचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. गूळ पोटासाठी आणि संपूर्ण शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. गूळ खाल्ल्याने आपली चयापचय क्रिया चांगली राहते. हे पचनासाठी देखील खूप फायदेशीर आहे. यामध्ये लोह आढळून येते ज्यामुळे अॅनिमिया सारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. तसेच थंडीत गुळामुळे शरीरात उष्णता निर्माण होते.

तीळ 

हिवाळ्यात तीळ खाणे खूप फायदेशीर आहे. तिळाचे गुणधर्म नैसर्गिकरित्या उष्ण आहे. त्यामुळे हिवाळ्यात शरीर आतून उबदार ठेवण्यास मदत होते. तिळामध्ये फॅट आणि प्रथिने आढळतात ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. हाडांसाठीही तीळ फायदेशीर आहे. तीळ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि सर्दी-खोकला यांसारख्या सामान्य आजारांशी लढण्याची ताकद मिळते.

शेंगदाणे

हिवाळ्यात शेंगदाणे खाणे खूप फायदेशीर आहे. शेंगदाण्यामध्ये फॅट आणि प्रथिने चांगल्या प्रमाणात असतात ज्यामुळे ऊर्जा मिळते आणि शरीर उबदार राहते. याशिवाय व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि इतर खनिजे देखील शेंगदाण्यात आढळतात जे सर्दीशी लढण्यास मदत करतात. शेंगदाणे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून आपले संरक्षण होते. त्यामुळे हिवाळ्यात शेंगदाणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते.

बदाम 

हिवाळ्यात बदाम खाणे खूप फायदेशीर आहे. बदामामध्ये प्रथिने, निरोगी फॅट, विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे सर्व घटक थंडीच्या दिवसांत शरीराला उबदारपणा देतात आणि रोगांशी लढण्यास मदत करतात.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss