Saturday, April 27, 2024

Latest Posts

‘या’ ५ थंड ठिकाणांना उन्हाळ्यात द्या भेट, गारेगार वातावरण करेल मन प्रसन्न

सध्या सर्वत्र कडक ऊन आहे. अशात घराबाहेर निघणे देखील कठीण होऊन जाते. तसेच लहान मुलांना सुट्टी असल्याने त्यांना एवढ्या रखरखत्या उन्हात बाहेर खेळायला देखील सोडता येत नाही. अश्या वेळेस सहकुटुंब थंड ठिकाणी सहलीला जाणे फायदेशीर ठरते.

सध्या सर्वत्र कडक ऊन आहे. अशात घराबाहेर निघणे देखील कठीण होऊन जाते. तसेच लहान मुलांना सुट्टी असल्याने त्यांना एवढ्या रखरखत्या उन्हात बाहेर खेळायला देखील सोडता येत नाही. अशा वेळेस सहकुटुंब थंड ठिकाणी सहलीला जाणे फायदेशीर ठरते. पण जायचं नेमकं कुठे हा पुन्हा पुढचा प्रश्न. परंतु, महाराष्ट्रात अशीही काही ठिकाणे आहेत जिथे कडक उन्हाळ्यात ही भेट देता येऊ शकते. जाणून घेऊया महाराष्ट्रातील अशा ५ थंड ठिकाणांबद्दल.

१. लोणावळा

लोणावळा हे पुणे जिल्ह्यातील ठिकाण आहे. निसर्गरम्य परिसर आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून हे ओळखले जाते. लोणावळा विपुल वनराई, निसर्ग शोभा, डोंगरमाथे, विविध दऱ्या, धबधबे यांनी वेढलेले असून येथील वातावरण मनाला सुखद वाटते. मुंबई – पुणे महामार्गावर समुद्र सपाटीपासून ६२५ मीटर उंच असून सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे.

२. माथेरान

साधारण ८०३ मीटर किंवा २६०० फूट उंचीवर माथेरान वसलेले आहे. पुणे मुंबईतील नागरिक सहसा या ठिकाणी दिसतात. थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे माथेरान घनदाट झाडी आणि पायवाटांनी भरलेला आहे. माथेरान मध्ये जवळजवळ १५० प्रकारची झाडे आहेत याच बरोबर सदाहरित जंगले आणि वने देखील आहेत. ज्यांमुळे ऊन सहसा लागत नाही.

३. पाचगणी

महाबळेश्वर इतकेच थंड आणि उंचीवर असलेले ठिकाण म्हणजे पाचगणी. पाच डोंगरांवर वसलेले असल्याने या ठिकाणचे नाव पाचगणी पडले. महाबळेश्वर जवळच पाचगणी असल्यामुळे दोन ठिकाणे सोबतच फिरता येतात.

४. आंबोली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमध्ये वसलेले आंबोली हे एक गाव आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी आंबोलीही एक आहे. आंबोली हे निसर्गरम्य आणि सुंदर असे पर्यटन स्थळ आहे. ६९० मीटर उंचीवर असलेल्या या ठिकाणी विविध पक्ष्यांचे देखील दर्शन होते.

५. चिखलदरा

सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत मोडणारे व समुद्र सपाटीपासून ३५६४ फूट उंच असणारे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथील हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. तसेच चिखलदऱ्यामध्ये व्याघ्रप्रकल्प घोषित केल्यामुळे तुम्हाला विविध वाघ ही इथे दिसू शकतात.

हे ही वाचा:

संपली परीक्षार्थींची प्रतीक्षा, जाहीर झाला UPSC परीक्षेचा निकाल

‘फकिरा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला, NANA PATEKAR सह झळकणार SAYAJI SHINDE

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss