Monday, April 29, 2024

Latest Posts

संपली परीक्षार्थींची प्रतीक्षा, जाहीर झाला UPSC परीक्षेचा निकाल

यूपीएससी परीक्षेचा निकाल (Upsc Main Result) जाहीर झाला आहे आणि अखेर परीक्षार्थींची प्रतीक्षा संपली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सीएसईचा निकाल जाहीर झाला आहे. upsc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन परीक्षार्थी आपला निकाल तपासू शकतात. यावर्षी यूपीएससी परीक्षेमध्ये मुलांनीच बाजी मारल्याची दिसून येत आहे. आदित्य श्रीवास्तव (Aaditya Shrivastav) संपूर्ण देशात पहिला आलेला आहे. यूपीएससी सीएसई माईन परीक्षा २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या १०१६ विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या निकालात लखनौच्या आदित्य श्रीवास्तव(Aaditya Shrivastav) हा अव्वल ठरला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अनिमेश प्रधान (Animesh Pradhan) आणि तिसऱ्या क्रमांकावर डोनुरू अनन्या रेड्डी (Ananya Reddy) आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने मुख्य निकालातील नियुक्तीसाठी १०१६ उमेदवारांची शिफारस केली आहे. तरी यंदा च्या निकालात मुलांनी बाजी मारल्याचे दिसून आले. upsc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन निकाल तपासू शकतात.

कर सहायक, गट-क या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी प्रसिद्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३, मधील कर सहायक, गट-क या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीक‍रिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. टंकलेखन कौशल्य चाचणी अर्हताकारी/पात्रता (Qualifying) स्वरुपाची असून त्याबाबत उमेदवारांना आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्धिपत्राद्वारा स्वतंत्ररित्या कळवण्यात येणार असल्याचे आयोगाने कळविले आहे.

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा – २०२३ राज्य कर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ५ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट – ब सेवा मुख्य परीक्षा – २०२३ या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या एकूण १५९ पदांचा अंतिम निकाल १५ एप्रिल, २०२४ रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील अवधूत अनिल दरेकर हे राज्यात प्रथम आले आहेत. तसेच महिला वर्गवारीतून पुणे जिल्ह्यातील अश्लेषा शशिकांत जाधव, ह्या राज्यात प्रथम आल्या आहेत. मागासवर्गवारीतून कोल्हापूर जिल्ह्यातील रोहित विठ्ठल बेहेरे  हे राज्यात प्रथम आले आहेत.
उमेदवारांच्या माहितीसाठी या परीक्षेचा अंतिम निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे. अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळास भेट द्यावी असे आयोगाने कळविले आहे.

हे ही वाचा:

‘फकिरा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला, NANA PATEKAR सह झळकणार SAYAJI SHINDE

‘अलबत्या गलबत्या’ आता थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss