Sunday, April 28, 2024

Latest Posts

‘फकिरा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला, NANA PATEKAR सह झळकणार SAYAJI SHINDE

अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी ‘फकिरा’ ही सर्वांना परिचित असेलच. १९६१ सालीचा सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार या कादंबरीला मिळाला आहे. या कादंबरीला वि.स.खांडेकरांची प्रस्तावना असून, संघर्ष हा कादंबरीचा मध्यवर्ती विषय आहे. ग्रामीण, प्रादेशिक, ऐतिहासिक, दलित म्हणू कादंबरी महत्त्वाची आहे. ती एका उपेक्षित नायकाचे बंडखोर जीवन दर्शवते. समाज परिवर्तनाचा दृढ विचार ही कादंबरी मांडत असून त्यात एक मोठा इतिहास दडलेला दिसून येतो.

याच कादंबरीवर आधारित ‘फकिरा’ हा चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लाँच झाले. भाऊसाहेब कऱ्हाडे (Bhausaheb Karhade) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये आपल्याला अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत. मंदार जोशी (Mandar Joshi) व भाऊसाहेब कऱ्हाडे यांनी पटकथा व संवाद लिहलेला असून, पुढच्या वर्षी म्हणजेच २०२५ साली हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती भाऊसाहेब यांनी दिली आहे. रुद्र ग्रूप (Rudra Group) आणि चित्राक्षी (Chitrakshi) यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

चित्रपटात नाना पाटेकर (Nana Patekar), सयाजी शिंदे (Sayaji Shinde), प्रसाद ओक (Prasad Oak), मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni), किरण माने (Kiran Mane), संदीप पाठक (Sandip Pathak) आणि नागेश भोसले (Nagesh Bhosale), मकरंद देशपांडे (Makarand Deshpande), कमलेश सावंत (Kamlesh Sawant) हे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट २०२५ मध्ये लाँच होणार असल्याने प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. चित्रपटाबाबतची माहिती दिग्दर्शक भाऊ कऱ्हाडे यांनी आपल्या सोशल मिडिया हॅन्डल वरून दिली आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या नजरा या चित्रपटाकडे लागून आहेत.

हे ही वाचा: Satara Loksabha Constituency चा तिढा सुटला, Udayanraje Bhosale यांना BJP कडून उमेदवारी जाहीर रामनवमी निमित्त द्या या ‘पावन’ जागेस भेट, मुंबईकरांना मिळालेला ऐतिहासिक वारसा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss