उन्हाळ्यामुळे सगळीकडे उष्णतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्याला बऱ्याचवेळा कामानिमित्त बाहेर जावे लागते. त्यासाठी शरीराबरोबर त्वचेची काळजी घेणे पण महत्वाचे आहे. उन्हाळ्यात सन टॅनिंग, सन बर्निंगची अशा समस्या होत असतात. जसजसे तापमान वाढणार तशा समस्या पण वाढत जाणार. त्वचेचे रक्षण करण्यासाठी अनेकजण बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन (Sunscreen) वापरा अस सांगतात. SF युक्त सनस्क्रीनचे विविध प्रकार, ब्रँड, बाजारात आले आहेत. हे त्वचेचे रक्षण करण्यास मदत करतात. सनस्क्रीनमध्ये केमिकल्सचा वापर केला जातो. त्यामुळे त्वचेला हानी पोहचू शकते. म्हणूनच, आम्ही तुम्हाला नैसर्गिक सनस्क्रीन घरच्याघरी कसे बनवायचे याबद्दल सांगणार आहोत.
दूध आणि लिंबाचा रस
दूध आणि लिंबाचा रस सनस्क्रीन बनवण्यासाठी आपण वापरू शकतो. दूध त्वचेला सूर्यकिरणांपासून बचाव करण्यास मदत करते. दुधामध्ये घटक फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडीन, कॅल्शियम असतात. दूध त्वचेची नैसर्गिक चमक कायम ठेवण्यास मदत करते. थंड कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्यास चेहरा चांगला राहतो. लिंबाच्या रसामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ असते. लिंबाचा रस वापरल्यास चेहऱ्यावर सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे येणारे काळे डाग कमी होण्यास मदत मिळते.
‘असे’ बनवा घरच्या-घरी सनस्क्रीन (Sunscreen):
दोन चमच कच्चे दूध घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस मिसळा. लिंबाचा रस वापरताना फक्त ५ थेंब वापरावा. कारण, लिंबामध्ये सायट्रिक एसिड असते. ते मिश्रण चांगले मिक्स केल्यानंतर एक कापसाचा बोळा घ्या. बनवलेले सनस्क्रीन कापसाने नीट चेहऱ्यावर लावा. असे केल्यास चेहरा चांगला आणि निरोगी राहतो. सन टॅनिंग, सन बर्निंगचा त्रास यामुळे कमी होऊ शकतो.
हे ही वाचा:
खेळाडू Hardik Pandya ने घेतला ब्रेक? सामन्यात असणार की नाही?
Kejriwal यांना कोर्टाचा दणका, सुनावली १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Follow Us