Saturday, July 27, 2024

Latest Posts

डोळ्यांखालील डार्क सर्कल कमी करण्यासाठी मधासोबत ‘या’ पदार्थांचा वापर करा

डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल आल्यानंतर अनेकदा ती लपवण्यासाठी वेगवेगळे प्रॉडक्ट वापरले जातात.

डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल आल्यानंतर अनेकदा ती लपवण्यासाठी वेगवेगळे प्रॉडक्ट वापरले जातात. अपुरी झोप आणि इतर काही कारणांमुळे डोळ्याच्या खाली डार्क सर्कल येतात. या डार्क सर्कलमुळे चेहऱ्याचे सौंदर्य होते. चेहरा सुरकुतलेला आणि निस्तेज दिसू लागतो. अनियमित जीवनशैली, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, डिहायड्रेशन, निद्रानाश किंवा जास्त ताण यामुळे डार्क सर्कल येतात. पण जर तुम्हाला डोळ्यांच्या खाली डार्क सर्कलची समस्या दूर करायची असले तर तुम्ही मधामध्ये काही घरगुती पदार्थ मिक्स करून लावू शकता. त्यामुळे डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते. मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे डार्क सर्कल कमी होतात. तसेच चेहऱ्याचा रंग ही उजळतो.

मधामध्ये लिंबाचा रस मिक्स करून लावण्याने डार्क सर्कल कमी होतात. लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक अॅसिड असतं जे चेहऱ्यावरील डाग कमी करण्यास मदत करतात. एका छोट्या वाटीमध्ये २ चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिक्स करून ही पेस्ट तुम्ही डोळ्यांच्या भोवती लावू शकता. त्यानंतर २ ते ३ मिनिटं लावून झाल्यावर मसाज करा. हे १० मिनिटं तसेच ठेवून द्या. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. हे आठवड्यातून २ ते ३ वेळा केल्याने डार्क सर्कल कमी होतात.

डोळ्यांच्या खालील काळेपणा कमी करण्यासाठी मध आणि टोमॅटोच्या रसाचा वापर तुम्ही करू शकता. एका वाटीमध्ये २ चमचे मध आणि एक चमचा टोमॅटोचा रस टाकून ते मिक्स करून घ्या. त्यानंतर ते डोळ्यांच्या खाली लावा. लावून झाल्यानंतर डोळ्यांच्या खाली २ ते ३ मिनिटं मसाज करून घ्या. त्यानंतर १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

अपुरी झोप, ताणतणाव यामुळे अनेकदा चेहऱ्यावर डार्क सर्कल वाढतात. मध आणि कोरफडीचा गर वापरून तुम्ही हे डार्क सर्कल कमी करू शकता. एका वाटीमध्ये मध आणि कोरफडीचा गर मिक्स करून डोळ्यांच्या खाली लावून घ्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. हे तुम्ही आठवड्यातून ३ ते ४ वेळा लावून घ्या.

हे ही वाचा:

ज्यांनी पक्ष काढला त्यांच्याकडून पक्षाचं नाव, चिन्ह हिसकावून घेतलं, सुप्रिया सुळे

वाशीमध्ये जल्लोष का केला गुलाल का उधळला? छगन भुजबळांनी जरांगेंना विचारला प्रश्न

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss