Tuesday, April 16, 2024

Latest Posts

ज्यांनी पक्ष काढला त्यांच्याकडून पक्षाचं नाव, चिन्ह हिसकावून घेतलं, सुप्रिया सुळे

राज्यातील आशाताई आपल्या मागण्यांकरिता आंदोलन करत आहे. ज्या मागण्यांकरिता आशाताई आंदोलन करत आहे. या मागण्या पूर्ण करण्याकरिता आरोग्यमंत्र्यांकडे अधिकार नाही असे ऐकण्यात येत आहे.

राज्यातील आशाताई आपल्या मागण्यांकरिता आंदोलन करत आहे. ज्या मागण्यांकरिता आशाताई आंदोलन करत आहे. या मागण्या पूर्ण करण्याकरिता आरोग्यमंत्र्यांकडे अधिकार नाही असे ऐकण्यात येत आहे. त्यामुळे नेमके राज्यातील ट्रिपल इंजन खोके सरकार कोण चालवत आहे असा प्रश् उपस्थित होत आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. मुंबईतील आझाद मैदान येथे आशाताई यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलना स्थळी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आशा सेविका त्यांची सुख दु:ख, त्यांचे प्रश्न त्यांची आव्हानं मी फार जवळून काम पाहिलंय, कोविडमध्ये देशात ज्या प्रकारे जबाबदारीने काम केलं, तशा पद्धतीने कोणी करू शकणार नाही, त्यांना न्याय मिळाला नाही, वेळ पडली तर मी देखील त्यांच्यासोबत उपोषणाला बसेन असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलताना सांगितलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, आशा सेविकांची सुख दु:ख, त्यांचे प्रश्न त्यांची आव्हानं मी फार जवळून काम पाहिलंय, कोविडमध्ये देशात ज्या प्रकारे जबाबदारीने काम केलं, तशा पद्धतीने कोणी करू शकणार नाही, केंद्र सरकारचा आयुष्यमान भारत सारख्या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू या आशा सेविका आहे, असं असतानाही दिवाळीपासून त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्याच्या विरोधात आपण लढलं पाहिजे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, आज आशा सेविका रस्त्यावर उतरल्या आहेत. आधी आंगणवाडी सेविकाचं झालं. आता आशाताईचं आंदोलन सुरू आहे, त्यांच्यासोबत उभं राहणं आपल्या सर्वांचाची नैतिक जबाबदारी आहे. मात्र सरकारचं याकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे. त्यामुळे सरकार नेमकं कोण चालवतंय? असा प्रश्न निर्माण होतोय. आणि यात भरडल्या जातायत त्या मात्र आशा भगिनी, या भगिनींसाठी लवकरात लवकर न्याय मिळावा एवढीच आमची भूमिका आहे, पण जर न्याय मिळाला नाही, तर मी स्वत: रस्त्यावर उतरून त्यांच्यासोबत आंदोलन करेन, जर वेळ पडली तर उपोषणाला मी बसेन असे सुप्रिया सुळे म्हटल्या.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यासोबत काल आशा सेविका यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली त्यावेळी त्यांना असं सांगण्यात आले की आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना या संदर्भातील अधिकार नाही आहे असे या सर्वांच्या भाषणात मला ऐकू आलं आहे. त्यामुळे नेमकं ट्रिपल इंजन खोके सरकार सरकार कोण चालवते असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सरकारमध्ये कुठलाही मेळ नाही आहे यामध्ये मात्र आशा सेविका भरडल्या जात आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जे समिती स्थापन केली आहे त्याची लवकरात लवकर बैठक घेऊन अशा सेविकांचं मागण्या पूर्ण करण्यात याव्या जर असं नाही झालं तर आशा सेविकांच्या मागण्यांकरिता मी स्वतः उपोषणाला बसणार आहे यापुढे मी कुठल्याही आशा वर्कर ला उपोषण करू देणार नाही त्यांच्या वतीने मी उपोषणाला बसणार असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना, संस्थापक सदस्य आणि अध्यक्ष शरद पवारच आहेत. त्यामुळे संस्थापक सदस्याकडून, ज्यानं पक्ष स्थापन केला, त्याच्याकडून पक्ष हिसकावून घेण्याचं पाप अदृश्य शक्ती करत आहे. हा पक्षातच नाही, तर देशात एक नवीन पायंडा पाडला जातोय. कारण एखादा निर्णय फक्त एखाद्या व्यक्तीबद्दल सीमित नसतो. इतिहासात त्याची नोंद होते. ज्या माणसानं पक्ष काढला, त्याच्यावर अन्याय करून त्याचं चिन्ह आणि पक्ष हिसकावून घेतला जातोय. त्याच्याविरोधात आम्ही कोर्टात गेलो आहोत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अशोक चव्हाणांबाबत मला आश्चर्य वाटतंय. कारण श्वेतपत्रिकेची चर्चा गेल्या आठवड्यात संसदेत झाली. त्यावर भाजपाच्या मुख्य नेत्यांनी आदर्श घोटाळा व अशोक चव्हाणांचं नाव घेतलं होतं. निर्मला सीतारमण यांनी अशोक चव्हाण यांचं नाव घेतलं नव्हतं, पण आदर्श घोटाळ्यावर बोलल्या होत्या. त्यामुळे आधी आरोप करा आणि आठ दिवसांत त्यांना पक्षात घ्या असा नवीन ट्रेंड भाजपानं सुरू केला आहे असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.यावर सविस्तर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आजच्या निकालाकडून माझी काहीच अपेक्षा नाही आहे. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच म्हणतात अदृश्य शक्ती सर्वच ठरवते, मग काय अपेक्षा ठेवणार आहे. जर आमचे सर्व आमदार अपात्र ठरले तर आम्ही न्यायालयात जाऊ असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या आहेत. सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना, सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार साहेब आहेत. हे कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. त्यामुळे ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांच्याकडून पक्ष हिसकावून घेण्याचं पाप अदृष्य शक्ती करत आहे. या पक्षावरच नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेवर आणि देशावर एक नवा पायंडा मांडत आहेत. कारण एखादा निर्णय हा फक्त राजकीय किंवा सामाजिक असेल तर तो त्या व्यक्तीबद्दल सिमीत नसतो. त्याची पुढे इतिहास नोंद होते. त्यामुळे ज्या माणसाने पक्ष काढला. त्याच्यावर अन्याय करून त्याच्याकडून पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेतलं जातं आहे. याच्याविरोधात आम्ही न्यायालयात गेलो आहोत असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

 हे ही वाचा:

पॅराग्लायडिंगच्या निसर्गसंपन्न पंढरीमध्ये रंगणार ‘टाइम महाराष्ट्र’चे महापॅराग्लायडिंग

‘टाइम महाराष्ट्र’ च्या प्रेक्षकांना मिळणार Free Paragliding ची संधी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss