Monday, May 20, 2024

Latest Posts

“बंजारा समाजाचे मत मलाच मिळणार”; पंकजा मुंडेची कथित ऑडियो क्लिप व्हायरल

बीडमधून महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankja munde)भाजपकडून ही निवडणूक लढवणार आहेत.काल ७ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm narendra modi) यांनी पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ सभा देखील घेतली होती.

बीडमधून महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankja munde)भाजपकडून ही निवडणूक लढवणार आहेत.काल ७ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm narendra modi) यांनी पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ सभा देखील घेतली होती. १३ मे रोजी बीड मध्ये मतदान होणार आहे. पंकजा मुंडे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार रविकांत राठोड देखील निवडणूक लढवणार आहेत. अश्यातच पंकजा मुंडे यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात पंकजा मुंडे अपक्ष उमेदवार रविकांत राठोड(Ravikant rathod) यांना फॉर्म मागे घेण्यास विनंती करताना दिसून येत आहेत. एवढंच नाही तर बंजारा समाजाची मत देखील मलाच मिळणार आहेत म्हणून दहा पाच हजार मतांनी काही होणार नाही असं ही वक्तव्य त्यांनी म्हटलं आहे.

सध्या बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद चालू असताना पंकजा मुंडे यांची कथित ऑडियो क्लिप व्हायरल झाली. अपक्ष उमेदवार रविकांत राठोड यांना विनंती करत पाठिंबा देण्यास सांगत आहेत. विशेष म्हणजे महामंडळाच्या संदर्भात देखील मी तुमची मदत करेल असे देखील त्या म्हणाल्या आहेत.पंकजा मुंडे यांंची कथित ऑडियो क्लिप व्हायरल झाल्याने बीडमध्ये चर्चांना उधाण आले आहे.

कोण आहेत रविकांत राठोड?

रविकांत राठोड (Ravikant rathod )या आधी शरद पवार गटाचे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करत होते. बीड मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या मतदानासाठी त्यांनी अपक्ष फॉर्म भरल्यानंतर त्यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केल्यानंतर धनंजय मुंडे(Dhananjay munde ) यांच्या नेतृत्वात ते काम करत आहे.

दरम्यान, या व्हायरल झालेल्या कथित ऑडियो संदर्भात पंकजा मुंडे(pankja munde ) यांनी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही कथित ऑडिया व्हायरल झाल्याने राजकीय क्षेत्रात अधिक चर्चा रंगणार आहे.बीड येथे चौथ्या टप्प्यात मतदान होणार.मतदानाआधीच ऑडियो क्लिप व्हायरल झाल्याने याचा मतदानावर काय परिणाम होणार हे पाहणं तितकचं महत्त्वाच असणार.

हे ही वाचा:

“जागतिक रेडक्रॉस दिन” नेमका काय आहे ? जाणून घ्या इतिहास

“काँग्रेस आणि आमच्या विचारधारेत फारसा फरक नाही”; शरद पवारांचा दावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss