Sunday, May 19, 2024

Latest Posts

EXCLUSIVE CM Eknath Shinde: इंडिया आघाडीचं नाव बदलून पाकिस्तान आघाडी ठेवायला हवं, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाइम महाराष्ट्र ला विशेष मुलाखत दिली. टाइम महाराष्ट्रचे मुख्य संपादक राजेश कोचरेकर यांना मुलाखत देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक विषयांवर चर्चा करत अनेक गौप्यस्फोट केले.

सोमवारी (६ मे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ‘Time Maharashtra’ ला विशेष मुलाखत दिली. Time Maharashtra चे मुख्य संपादक राजेश कोचरेकर (Rajesh Kocharekar) यांना मुलाखत देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक विषयांवर चर्चा करत अनेक गौप्यस्फोट केले.

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) प्रचारार्थ महायुतीने (Mahayuti) ‘आपले मत कोणाला? तुमच्या मतामुळे आनंद कोणाला होईल भारताला का पाकिस्तानला?’ या आशयाची जाहिरात सर्वत्र प्रसिद्ध केली होती. यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली. विरोधकांनी या जाहिरातीविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे. याबाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले, “यामध्ये काँग्रेसचा काही उल्लेख होता का? यावरून कुणी कोर्टात जात आहे तर कुणी निवडणूक आयोगाकडे जात आहे. या जाहिरातीमध्ये फक्त देशाभिमान होता. त्यात काँग्रेसचे नाव अजिबात नव्हते म्हणजेच ‘चोराच्या मनात चांदणे!'”

ते पुढे म्हणाले, “कसाबने ज्या निरपराध लोकांना मारलं त्यांच्याबद्दल यांना काही संवेदना नाहीत. शाहिद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांना कसाबची गोळी नाही लागली असे म्हणणे म्हणजे या तमाम देशवासियांचा, शहिदांचा आणि पोलिसांचा अपमान आहे. कुठे फेडणार हि पापं? आणि म्हणून यांना धडा शिकवल्याशिवाय या देशातील जनता स्वस्थ बसणार नाही.”

इंडिया आघाडीवर (INDIA Alliance) टीका करत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “हे इंडीया आघाडीवाले असे का बोलू लागले आहेत?    मला वाटत आता यांच नाव बदलून इंडिया आघाडीऐवजी पाकिस्तान आघाडी ठेवलं तर अयोग्य होणार नाही. आता बेगडी हिंदुत्ववादी, नकली हिंदुत्ववादी कुठे गेले? त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. आज बाळासाहेब असते तर यांना…” वाक्य अर्धवट बोलून त्यांनी आपला रोष व्यक्त केला.

अमित शहा (Amit Shah) यांनी एका प्रचारसभेत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा (Shivsena UBT) ‘नकली शिवसेना’ असा उल्लेख केला होता. यावरून प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “असली शिवसेना म्हणजे ज्यांच्याकडे बाळासाहेबांचे विचार आहेत, आचार आहेत. ज्यांच्याकडे धनुष्यबाण आहे. ज्यांच्याकडे देशभक्तीचा विचार आहे तेच असली. ज्यांनी खुर्ची मिळवण्यासाठी बाळासाहेबांचे विचार सोडले, धनुष्यबाण सोडला. ज्या लोकांबरोबर निवडून आले त्यांच्या पाठीवर खंजीर खुपसला ते कसे असली होऊ शकतात? या महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी फसवलं. लग्न एकाबरोबर आणि संसार दुसऱ्याबरोबर का? मुख्यमंत्री बनायला? मग ते असली आहेत का नकली आहेत?” असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी विचारला.

हे ही वाचा:

Exclusive CM Eknath Shinde: कॉंग्रेसचा हात पाकिस्तान के साथ……

EXCLUSIVE CM Eknath shinde यांची इंडिया आघाडीवर टीका, पाकिस्तान धार्जिणेंची देशातील जनता…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss