Tuesday, May 21, 2024

Latest Posts

मोदी सरकारच्या योजनांचा मुस्लिमांना लाभ म्हणून Sunil Tatkare यांना मुस्लिम मते मिळणार – Pravin Darekar

भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी आज (मंगळवार, ३० एप्रिल) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मोठे काम केले असून आमची निवडणूक विकसित भारतासाठी आहे,” असे वक्तव्य केले आहे.

यावेळी रायगड लोकसभा मतदारसंघाविषयी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, “मोदी सरकारने केलेल्या अनेक योजनांचा लाभ मुस्लिम बांधव घेत आहेत. त्यामुळे महायुतीचे आमचे उमेदवार सुनील तटकरे यांना मोठ्या प्रमाणात मुस्लिम मते मिळतील. सध्या विरोधकांकडे विकासाचा मुद्दा नाही आहे. राष्ट्रहिताच्या दृष्टीने कोणतेही धोरण त्यांच्याकडे नाही. अनंत गीते (Anant Gite) यांनी सहावेळा खासदार होऊन रायगडला काय दिले आहे ? सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी आमदार आणि खासदार असताना भरपूर कामे केली आहेत. विरोधकांकडून ध्रुवीकरणाच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. विकसित भारताचा अजेंडा आमच्याकडे आहे. मी आश्वस्त करतो कि अडलेले सर्वं प्रोजेक्ट तटकरेंच्या माध्यमातून पुढे घेऊन जाऊ. येथील तरुणांना येणाऱ्या काळात जास्तीत जास्त रोजगार कसा मिळेल यासाठी प्रयत्न करु.”

लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे काम केले असून आमची निवडणूक विकसित भारतासाठी आहे.” दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली असून आपच्य इतर नेत्यांवरही कारवाई चालू आहे. ईडी सीबीआय सारख्या संस्थांचा भाजपकडून गैरवापर होत असल्याचा आरोप इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. यासंदर्भात बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, “हा आरोप चुकीचा असून भाजपच्या अनेक नेत्यांवरदेखील कारवाई होते. वेगवेगळ्या पक्षात असाताना वेगवेगळे आरोप होत असतात परंतु आरोप सिद्धत्वास यावे लागतात. अजित पवार यांच्याबाबतीतही हेच झाले आहे. अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यामध्ये क्लिन चीट देण्यात आली आहे.”

हे ही वाचा:

अखेर ठरलं! उत्तर पश्चिममधून वायकरांना उमेदवारी जाहीर

Exclusive: Thane लोकसभेतून Naresh Mhaske यांची उमेदवारी निश्चित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss