Wednesday, May 8, 2024

Latest Posts

Exclusive Arjun Dangale: आंबेडकरी चळवळ, संविधान, डॉ. आंबेडकर आणि मोदी

नुकतेच ज्येष्ठ दलित नेते आणि साहित्यिक अर्जुन डांगळे यांची टाइम महाराष्ट्र चे संपादक राजेश कोचरेकर यांनी मुलाखत घेतली अर्जुन डांगळे यांची संविधान, डॉ आंबेडकर, मोदी आणि त्यांची या सगळीकडे बगण्याची दृष्टी असा मुलाखतीचा विषय होता.

नुकतेच ज्येष्ठ दलित नेते आणि साहित्यिक अर्जुन डांगळे (Arjun Dangale) यांची टाइम महाराष्ट्रचे (Time Maharashtra) संपादक राजेश कोचरेकर (Rajesh Kocharekar) यांनी मुलाखत घेतली. ‘संविधान, डॉ आंबेडकर, मोदी आणि त्यांची या सगळीकडे बगण्याची दृष्टी’ असा मुलाखतीचा विषय होता.

भाजप जेव्हा कॅम्पेनिंगला उतरलं तेव्हा संविधानाला धोका आहे अशा स्वरूपाची चर्चा सुरु झाली संविधान बदलायचं आहे अशी ओरड सर्व विरोधकांनी सुरु केली तुम्ही या ओरडी कडे कस पाहतात? खरंच विरोधकांना याची भीती वाटते? असा प्रश्न विचारला गेल्यानंतर अर्जुन डांगळे म्हणाले, “संविधान बदलण्याचं षडयंत्र हे राष्ट्रीय सवयंसेवक संघाकडूनच चालू झालाय. संघाने हे संविधान नाकारलं होत. नरेंद्र मोदी हे या संघाचं प्रॉडक्ट आहेत. पाठयपुस्तक, शिक्षण पद्धती, प्रशासकीय पद्धती, कल्याणकारी योजना बदलणं, भारतीय संपत्ती उद्योगधंदे अडाणी, अंबानींच्या ताब्यात देणं आणि सरकारी नोकऱ्या कमी करण हे सगळं चालू आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे जेव्हा खालच्या समाजातील नाकारलेले लोक संविधानाच्या साहाय्याने प्रगती करतात आणि जेव्हा उच्चवर्णीयांची प्रतिसंबंध धोक्यात येतात तेव्हा एका प्रतिक्रांतीची सुरवात होते’.

काँग्रेसचे सरचिटणीस म्हणाले कि काँग्रेसने ही संविधानात ८० वेळा बदल केलाय तर हे खरं आहे का? यावर अर्जुन डांगळे म्हणाले, “बाबासाहेब देखील म्हणाले होते वेळेनुसार कलमात बदल करावे लागतील काँग्रेसनेही बदल केले आहेत आणीबाणीच्या वेळी असतील किंवा इतरच्या प्रश्नावर असतील. पण घटनेच्या कलमात दुरुस्ती करण म्हणजे संविधान बदलणं नाही. निवडणूक आयोगाचं काय झालं आहे सर्वांना माहित आहे. सर्व ताब्यात घेऊन नियंत्रित करून हुकूमशाहीकडे ही वाटचाल आहे. लोकांना लाचार आणि स्वाभिमानशून्य बनवलं जातंय. आरक्षणावर घाला आहे हा. खाजगी आणि पब्लिक सेक्टर मधल्या नोकऱ्या कमी करून त्या अडाणी अंबानी कडे सोपवणे. सामाजिक स्वातंत्र्यावर आणि मागास्वर्गीयांवर हा मोठा घाला आहे. वंचितांना प्रवाहात आणण्याचं काम या संविधानाने केलं. पण आता पुन्हा प्रवाहातून काढण्याचं प्रयत्न मोदी सरकार करत आहे.”

दलितांची एक वेगळी शक्ती जी बाबासाहेबांनाही कळली होती आणि आज प्रत्येक राजकारण्याला पण माहित आहे. पण या शक्तीचा शक्तिपात करण हे ज्यावेळेला सुरु झालय त्यावेळेला तुमच्यासारखे दलित नेते किंवा साहित्यिक, चळवळीतले लोक याकडे दुर्लक्ष करतायत. फायदा उचलला जातोय कि हा या दलित शक्तीला गैरफायदा आहे? या प्रश्नावर अर्जुन डांगळे म्हणाले, “आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी जनतेचं राजकीय शहाणंपण या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. सगळेच आंबेडकरी नेत्याचा आदेश मानतात त्यांच्या आदेशांचे तंतोतंत पालन करतात हा गैरसमज काढून टाका. पिढी सुशिक्षित झाल्यापासून, नवीन तरुणाई आल्यापासून हे सर्व झालय. नेते मंडळी बाबासाहेबांचं तत्वज्ञान लक्षात घेत नाहीत. स्वतःचे तत्वज्ञान निर्माण करून ते लोकांवर लादायला बघतात. स्वतःचे हितसंबंध सुरक्षित करण्यासाठी बाबासाहेबांच्या नावाने स्वतःचे तत्वज्ञान लोकांवर लादायला बघतात. बाबासाहेबांच्या तत्वज्ञानामुळे विखुरलेले जरी असले तरी आंबेडकरी जनता एक होऊन मतदान करते. समाज म्हणून एक जाणीव व बांधिलकी असते. वैचारिक पद्धतीने आंबेडकरी जनता बांधली गेलेली आहे.”

 

हे ही वाचा:

अयोध्येनंतर महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी बिग बींनी खरेदी केली प्रॉपर्टी

BJP ने चावी दिली तेवढेच बोलणाऱ्या Eknath Shinde यांनी Congress वर बोलू नये, Nana Patole यांचा घणाघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss