Wednesday, May 1, 2024

Latest Posts

Udayanraje Bhosale जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज करणार उमेदवारी अर्ज दाखल

सातारा लोकसभा मतदारसंघातील (Satara Loksabha Constituency) महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला असून राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना भाजपकडून (BJP) उमेदवारी देण्यात आली आहे. आज (गुरुवार, १८ एप्रिल) जोरदार शक्तिप्रदर्शन करून उदयनराजे भोसले उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत. या शक्तीप्रदर्शनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadavnis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Paawar) हे उपस्थित राहणार आहेत. साताऱ्यातील गांधी मैदानातून या रॅलीला सुरुवात होईल. यासाठी साताऱ्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शाशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांनी या जागेसाठी जोर लावला होता. सातारच्या जागेचा तिढा सुटल्यानंतर भाजपच्या उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याविरुद्ध उदयनराजे भोसले निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून प्रेसनोट जाहीर करण्यात आली होती, ज्यात उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याचे निश्चित करण्यात आले होते.

सातारा लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमधील घटकपक्ष असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात बरेच वाद निर्माण झाले होते. या जागेवर दोन्ही पक्षांनी आपला हक्क सांगितला होता. राष्ट्रवादीने जरी या जागेवर दावा केला असला तरीही उदयनराजे भोसले यांना भाजपकडून उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले होते. त्यामुळे उदयनराजे भोसले यांनी प्रचारालाही सुरुवात केली होती. तसेच, उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेटही घेतली होती. त्यामुळे, त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याच्या चर्चा होत होत्या. आता, महायुतीतर्फे ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

हे ही वाचा:

BJP च्या भट्टीत शिवसैनिकांचा बळी, CM Eknath Shinde यांचा अभिमन्यु झालाय, Shivsena नेत्याचे गंभीर आरोप

BJP कडून नव्या प्रसिद्ध चेहऱ्यांची चाचपणी सुरु, कोणता उमेदवार ठरणार सरस?। Ujjwal Nikam|Madhuri Dixit

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss