Monday, May 13, 2024

Latest Posts

महाराष्ट्रामध्ये ५ टप्प्यात होणार मतदान, जाणून घ्या तारखा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. देशामध्ये ७ टप्प्यात निवडणुका होणार आहेत. १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे देशभरात सगळीकडे निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. सात टप्प्यांतील मतदानापैकी महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे तर राज्यात पाच फेजमध्ये मतदान होणार आहे. तर ४ जून ला मतमोजणी होणार आहे.

देशात ७ टप्प्यात मतदान होणार

टप्पा १ : १९ एप्रिल २०२४
टप्पा २ : २६ एप्रिल २०२४
टप्पा ३ : ७ मे २०२४
टप्पा४: १३ मे २०२४
टप्पा५ : २० मे २०२४
टप्पा ६ : २५ मे २०२४
टप्पा७ : १ जून २०२४

पहिल्या टप्प्यातील मतदान (१९ एप्रिल)

महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल ला होणार आहे. रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर मध्ये १९ एप्रिल ला मतदान होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील मतदान (२६ एप्रिल)

दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल ला होणार आहे. यामध्ये वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, बुलढाणामध्ये २६ एप्रिल ला मतदान होणार आहे.

तिसऱ्या टप्प्यातील मतदान (७ मे)

राज्यात ७ मे ला ११ मतदारसंघात मतदान होणार आहे. रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघात मतदान केले जाणार आहे.

चौथा टप्प्यातील मतदान (१३ मे)

नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीडमध्ये १३ मे ला मतदान होणार आहे.

पाचव्या टप्प्यातील मतदान (२० मे)

महाराष्ट्रामध्ये २० मे ला पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात मतदान पार पडणार आहे.

हे ही वाचा:

यंदाच्या वर्षी तब्बल २ लाख मतदार हे १०० वर्ष वयाचे , निवडणूक आयुक्तांनी दिली माहिती

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपात प्रवेश,लोकसभा निवडणुक लढवण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss