Saturday, July 27, 2024

Latest Posts

राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्यात ४०० संस्थाचा सहभाग – Mangal Prabhat Lodha

हायलॅण्ड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे (पश्चिम) येथे कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक व युवतींकरिता राज्यस्तरीय ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ (Namo Maharojgar Melava) आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोमध्ये ४०० विविध औद्योगिक शासकीय व खाजगी संस्था सहभागी होणार असून हा मेळावा २४ आणि २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. या मेळाव्यात नोकरी इच्छुक युवक-युवती यांनी मुलाखतीसाठी आणि महाएक्सपो मध्ये स्टार्टअप्स, इनव्हेस्टर्स व इन्क्यूबेटर्स या सर्वांना सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत बेरोजगार युवक तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी आणि नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार मिळावा यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

मंत्रालयातील परिषद सभागृह येथे राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा (Namo Maharojgar Melava) पूर्व तयारीबाबत बैठक झाली. बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणाले की, या मेळाव्यात राज्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी आणि औद्योगिक संस्थांनी नावनोंदणी करावी यासाठी सर्व विभागांनी, स्थानिक प्रशासनाने याबाबत जनजागृती करावी. जास्तीत जास्त उद्योजक आणि विविध शासकीय आस्थापना यांनी याबाबत माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न करावेत. मेळाव्यासाठी उभारण्यात येणारे स्टॉल्स आणि रोजगार नोंदणी याबाबत स्थानिक प्रशासनाने आपल्या कार्यक्षेत्रातील औद्योगिक शासकीय व खासगी संस्था यांना देखील सहभागी करून घ्यावे. नमो महारोजगार मेळाव्यात नोकरी इच्छुक उमेदवार यांचा सहभाग वाढावा, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.तसेच नमो महारोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने उभारण्यात येणा-या सोयी-सुविधांचा अशा सूचना त्यांनी केल्या.

हे ही वाचा: 

शरद पवारांना संपवण्यासाठी त्यांची राजकीय हत्या केली जात आहे – जितेंद्र आव्हाड

जनता मूर्ख नाही,सगळं जाणते,तेजस्विनीने केलेलं हे ट्विट नेमकं कोणासाठी ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss