यंदा राज्यभरात अपेक्षित पाऊस न पडल्यामुळे काही भागात दुष्काळ पडला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक येणार आहे. या पाहणीसाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाचे १२ सदस्यांचे पथक राज्यातील दुष्काळ व खरीप नुकसानीचा आढावा घेण्यासाठी येणार आहेत. ते मराठवाड्यातील वेगेवेगळ्या जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. १३ व १४ डिसेंबर रोजी मराठवाड्यातील चार जिल्ह्यांची केंद्रीय पथक पाहणी करण्यासाठी येणार आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar), जालना (Jalna), बीड (Beed) आणि धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यांतील काही तालुके व गावांना हे पथक भेट असल्याची माहिती मिळत आहे.
मराठवाड्यात यंदा अपेक्षित असा पाऊस पडला नाही. आठ जिल्ह्यात अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे उरल्या सुरल्या पिकांचे नुकसान झाले नाही. त्यामुळे राज्य सरकारप्रमाणेच केंद्र सरकारने देखील मदत करण्याची मागणी केली आहे. याच पार्शवभूमीवर आता केंद्रीय पथक मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचा नुकसान पाहणी दौरा करणार आहे. त्यानंतर हे पथक पुण्यात बैठक घेऊन आव्हाल सादर करणार आहे. केंद्रीय पथकाच्या दौऱ्यानंतर दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना काय मदत मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. केंद्रीय कृषी विभागाच्या सहसचिव प्रिया राजन या पथकप्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली चार पथक तयार करण्यात आली आहेत. एमआयडीएचे सचिव मनोज के., सहसंचालक जगदीश साहू नीति आयोगाचे संशोधन अधिकारी शिवचरण मीना, पाणीपुरवठा विभागाचे अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरन जलसंपदा विभागाचे संचालक हरीश उंबरजे, ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रदीपकुमार, पुरवठा विभागाचे सचिव संगीतकुमार, पशुसंवर्धन विभाग सहआयुक्त एच. उपसचिव प्रदीपकुमार, पुरवठा विभागाचे सचिव संगीतकुमार, पशुसंवर्धन विभाग सहआयुक्त एच. आर. खन्ना, कापूस विकास विभागाचे संचालक डॉ. ए. एच. वाघमारे, एमएनसीएफसीचे उपसंचालक डॉ. सुनील दुबे, एमआयडीएचे कन्सलटंट चिराग भाटिया यांचा समावेश आहे.
केंद्रीय पथकाने तात्काळ महाराष्ट्रात जाऊन दुष्काळग्रस्त भागात जाऊन पाहणी करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. राज्यात कुठे ओला दुष्काळ तर कोठे कोरडा दुष्काळ असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे दुधाला भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्राला केंद्राने मदत करावी, अशी मागणी सुळे यांनी केली होती.
हे ही वाचा:
एनआयएची आयसीसवर मोठी कारवाई, देशभरातील ४४ ठिकाणी एनआयएची धाड
POLITICS: तरीही आपल्या आरोग्यमंत्र्यांना जाग आली नाही. असो!, ROHIT PAWAR यांची पोस्त चर्चेत