Saturday, July 27, 2024

Latest Posts

मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी दिल्लीत बैठक होणार

मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून संघर्ष करत आहे. त्यासाठी मोर्चे, आंदोलन, उपोषणही सुरू आहेत.

राज्यात गाजत असेल्या मराठा आरक्षण या विषयावर राज्यातील सर्व खासदारांनी एकमताने संसदेत आवाज उठवावा, यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका निश्चित करण्यासाठी त्यांनी राज्यातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे. येत्या सोमवारी (१८ डिसेंबर) रोजी दिल्ली येथे ही बैठक होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नारायण राणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे.

मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून संघर्ष करत आहे. त्यासाठी मोर्चे, आंदोलन, उपोषणही सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला छत्रपती संभाजीराजे यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. कायदेशीर प्रक्रियेची माहिती असल्याने त्यांनी हा पुढाकार घेतला असून काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्यातील सर्व खासदारांना पत्र पाठविले होते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधी या नात्याने आवाज उठविण्याचे आवाहन त्यांनी पत्राद्वारे केले होते. या पार्श्वभूमीवर सर्व खासदारांची दिल्ली येथे त्यांनी बैठकीचे आयोजन केले आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे ही बैठक होणार असून या बैठकीस शरद पवार, नितीन गडकरी, नारायण राणे, रामदास आठवले, सुप्रिया सुळे यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे खासदार या बैठकीला उपस्थित राहणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून संघर्ष करत आहे. त्यासाठी मोर्चे, आंदोलन, उपोषणही सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला छत्रपती संभाजीराजे यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. कायदेशीर प्रक्रियेची माहिती असल्याने त्यांनी हा पुढाकार घेतला असून काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्यातील सर्व खासदारांना पत्र पाठविले होते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधी या नात्याने आवाज उठविण्याचे आवाहन त्यांनी पत्राद्वारे केले होते.

हे ही वाचा:

Nana Patole यांचा थेट हल्लाबोल, भाजप शिवरायांचा महाराष्ट्र पेटवतंय…

संसदेत झालेल्या गोंधळावर संजय राऊतांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss